शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दोन संसार मोडल्यानंतर ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत, पूर्वाश्रमीच्या पतीवर शारीरिक संबंध व हिंसाचाराचे आरोप अन्…  

Saurabh Moreby Saurabh More
जून 15, 2024 | 5:47 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood actress Chahat Khanna is getting married to Rohan Gandotra rumours viral on social media

दोन संसार मोडल्यानंतर ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत, पूर्वाश्रमीच्या पतीवर शारीरिक संबंध व हिंसाचाराचे आरोप अन्...

आपल्या सौंदर्याने व अभिनयाने कायमच चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री चाहत खन्ना सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. दोन अयशस्वी लग्नानंतर अभिनेत्री आता पुन्हा एकदा लग करणार आहे. दोनदा लग्न मोडल्यानंतर चाहत खन्ना आता तिच्यापेक्षा चार वर्षांनी लहान अभिनेता रोहन गंडोत्राबरोबर लग्न करणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, अद्याप दोघांनीही याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहन व चाहतचे नाते कोणापासून लपलेले नाही. चाहतबरोबरच रोहनचे अभिनेत्रींच्या मुलींबरोबरही चांगले संबंध आहेत. सध्या दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. रोहनबरोबरचे नाते पुढे नेण्यासाठी चाहत तयार आहे. तसेच दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र, या प्रकरणी चाहत किंवा तिचा बॉयफ्रेंड रोहन गंडोत्राकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

View this post on Instagram

A post shared by Chahatt khanna (@chahattkhanna)

चाहत खन्ना ही एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. २८ जुलै १९८६ रोजी मुंबईत जन्मलेल्या चाहत खन्नाचे पहिले लग्न २००६मध्ये भरत नरसिंघानीबरोबर झाले होते. त्यावेळी अभिनेत्री फक्त २० वर्षांची होती. मात्र, चाहत आणि भरतचे लग्न टिकले नाही. २००७ मध्येच दोघांचा घटस्फोट झाला. या अयशस्वी विवाहानंतर चाहतने २०१३मध्ये फरहान मिर्झाबरोबर लग्न केले. मात्र, चाहत व फरहानचे नातेही फार काळ टिकले नाही. लग्नानंतर फरहान आणि चाहत यांना दोन मुली झाल्या. मात्र, २०१८ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

आणखी वाचा – पापलेट, कोळंबी मसाला अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांनी मच्छीवरही मारला ताव, अलिबाग ट्रिपचा व्हिडीओ व्हायरल

घटस्फोटानंतर चाहतने पतीच्या गैरकृत्यांबद्दल सांगितलं होतं. फरहान तिचं शारीरिक आणि मानसिक शोषण करायचं असं तिने म्हटलं होतं. चाहतचे तिच्या सहकलाकाराशी प्रेमसंबंध असल्याचा त्याला संशय होता. फरहानला सोडण्याचा निर्णय योग्य होता, असं चाहतने म्हटलं होतं.

आणखी वाचा – ‘तुला शिकवीन…’मधील मास्तरीनबाईंच्या खऱ्या आयुष्यातील सासू व आजेसासूबाईही बघतात मालिका, म्हणाली, “तेव्हा त्यांना वाईट वाटलं कारण…”

तसेच फरहान जबरदस्तीने संबंध ठेवत होता, असं चाहतने सांगितलं होतं. तिला बरं नसलं, आजारी असली तरी फरहान शारीरिक सबंध ठेवायचा, असं चाहतने म्हटलं होतं. हे सर्व मला माझ्या मुलींसाठी सहन करावे लागल्याचे तिने म्हटले होते. फरहानने मला माझ्या कुटुंबापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला हेही तिने म्हटले होते.

Tags: bollywood actressChahat KhannaChahat Khanna Marriage News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Shivani Surve taken a special ukhana for her husband and actor Ajinkya Nanaware

"अजिंक्य घरी बघत असेल माझी वाट", शिवानी सुर्वेचा नवऱ्यासाठी हटके उखाणा, लाजत म्हणाली...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.