शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अजिंक्य घरी बघत असेल माझी वाट”, शिवानी सुर्वेचा नवऱ्यासाठी हटके उखाणा, लाजत म्हणाली…

Saurabh Moreby Saurabh More
जून 15, 2024 | 6:26 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shivani Surve taken a special ukhana for her husband and actor Ajinkya Nanaware

"अजिंक्य घरी बघत असेल माझी वाट", शिवानी सुर्वेचा नवऱ्यासाठी हटके उखाणा, लाजत म्हणाली...

स्टार प्रवाह वाहिनीवरील देवयांनी या मालिकेमधून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी सुर्वे. शिवानी सुर्वे ही या मालिकेमुळे चांगलीच प्रसिद्धी झोतात आली. स्टार प्रवाहवरील ‘देवयानी’ या मालिकेनंतर आता शिवानी पुन्हा एकदा याच वाहिनीवरील एका नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. थोडं तुझं आणि थोडं माझं या नवीन मालिकेतून अभिनेत्री पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर मनोरंजन करायला सज्ज झाली आहे.

अभिनेत्री शिवानी सुर्वेसह स्टार प्रवाह वाहिनीवरीलच ‘गोठ’ फेम अभिनेता समीर परांजपे ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्याद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. शिवानी व समीर पहिल्यांदाच या मालिकेतून एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे या नव्या जोडीला पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.  अशातच या मालिकेच्या निमित्ताने मज्जा पिंकशी शिवानी सुर्वेने खास संवाद साधला. यावेळी तिने अजिंक्यसाठी खास उखाणाही घेतला.

यावेळी शिवानी सुर्वेने उखाणा घेत असं म्हटलं की, “‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिका घेऊन आली आहे तुमच्यासाठी खास, पण अजिंक्य पाहत आहे घरी माझी वाट”. या उखाण्यानंतर शिवानी गालातल्या गालात हसली. शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरे यांनी ३१ जानेवारीला गुपचूप साखरपुडा उरकत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्यानंतर १ फेब्रुवारीला शिवानी-अजिंक्यचा शाही विवाहसोहळा पार पडला.

आणखी वाचा – दोन संसार मोडल्यानंतर ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत, पूर्वाश्रमीच्या पतीवर शारीरिक संबंध व हिंसाचाराचे आरोप अन्…  

खऱ्या आयुष्यात शिवानी गेली अनेक वर्षे अजिंक्य ननावरेला डेट करत होती. या दोघांची पहिली भेट ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेच्या सेटवर झाली होती. पुढे दोघांच्या मैत्रीचं रुपांत प्रेमात झालं. २०१७ पासून शिवानी-अजिंक्य एकत्र होते. यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा – ‘तुला शिकवीन…’मधील मास्तरीनबाईंच्या खऱ्या आयुष्यातील सासू व आजेसासूबाईही बघतात मालिका, म्हणाली, “तेव्हा त्यांना वाईट वाटलं कारण…”

दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर शिवानी ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, तर अजिंक्य ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

Tags: ajinkya nanawaremarathi entertainment newsshivani surve
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
Ravi Jadhav shared a special post on son Atharva's graduation ceremony.

रवी जाधव यांचा मुलगा परदेशात झाला पदवीधर, लेकाची कामगिरी पाहून आनंद गगनात मावेना, म्हणाले, “अभिमान वाटत आहे की...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.