मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तुला शिकवीन…’मधील मास्तरीनबाईंच्या खऱ्या आयुष्यातील सासू व आजेसासूबाईही बघतात मालिका, म्हणाली, “तेव्हा त्यांना वाईट वाटलं कारण…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 16, 2024 | 9:11 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tula Shikvin Changlach Dhada fame Shivani Rangole's talk about her family reaction on the serial

'तुला शिकवीन...'मधील मास्तरीनबाईंच्या खऱ्या आयुष्यातील सासू व आजेसासूबाईही बघतात मालिका, म्हणाली, "तेव्हा त्यांना वाईट वाटलं कारण..."

नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून शिवानी रांगोळेला ओळखलं जातं. सध्या ती ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत अक्षरा हे पात्र साकारत आहे. मालिकेत सध्या अक्षरा-अधिपतीची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे.  प्रेमाची कबुली दिल्यावर त्यांचं नातं अधिक फुलताना दिसत आहे. अक्षरा व अधिपती यांच्या खऱ्या संसाराला आता कुठे सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रेक्षक अधिकच मालिकेच्या प्रेमात पडत आहेत.

आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तसेच शूटिंग असो किंवा वैयक्तिक आयुष्य शिवानी रांगोळे प्रत्येक अपडेट चाहत्यांबरोबर शेअर करत असते. शिवानी ही मृणाल कुलकर्णी यांची सून असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे घरात साहजिकच याबद्दल चर्चा होत असावी. त्यामुळे मालिकेबद्दल शिवानीच्या सासू मृणाल कुलकर्णी व घरच्यांची काय प्रतिक्रिया असते. याबद्दल तिने सांगितले आहे.

‘इट्स मज्जा’बरोबर मारलेल्या खास गप्पांमध्ये शिवानीने मालिकेबद्दल तिच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया असते. याबद्दल सांगितले आहे. यावेळी तिने असं म्हटलं की, “माझ्या फक्त सासूबाईच नाही तर दोन्ही आजेसासूबाईदेखील बसून ही मालिका बघतात. मध्यंतरी एका भागामध्ये मी सतत रडत होते. भुवनेश्वरी मला सतत काहीतरी बोलत होत्या. त्यामुळे मी रडत होते. तर यावर त्यांना खूप वाईट वाटलं होतं. तेव्हा त्या आमच्या सूनेला किती बोलतात किती रडवतात असं म्हणाल्या होत्या. ते बघून मला खूपच भरून आलं होतं”.

आणखी वाचा – ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वात जुने स्पर्धक सहभागी होणार?, कलाकारांच्या पोस्टमुळे चर्चा, उत्सुकता शिगेला

यापुढे तिने असं म्हटलं की, “ रात्री आठ वाजता आमच्या घरी ही मालिका बघण्याचा ठरलेला कार्यक्रम असतो. फक्त मालिका बघतातच असं नाही, तर त्यावर आनंदाने काय आवडलं? काय नाही? याबद्दल प्रतिक्रियाही देतात. मालिकांबद्दलच्या प्रतिक्रिया देण्यात खूप आपुकीने सहभागी होतात. माझे कुटुंब या क्षेत्रातील असूनही ते खूप सहभागी होतात”.

आणखी वाचा – कुणाकडे शरीरसुखाची मागणी तर कुणाला वाईट स्पर्श, ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रींना कास्टिंग काउचचा वाईट अनुभव, धक्कादायक सत्य समोर

यापुढे शिवानीने आपल्या सासूबाईबद्दल असं म्हटलं की, “मी अनेकदा असं म्हटलं आहे की, माझ्या सासूबाई या क्षेत्रात माझ्यासाठी वरिष्ठ असून मला त्या नेहमीच कामाबद्दल काहीना काही सूचना देत असतात. तसं घरी आम्ही ठरवून चर्चा करत नाही आणि खरं सांगायचं झालं तर आम्ही कामाविषयी बोलणं होत नाही. पण ती काय योग्य आहे? काय नाही?, काय केलं पाहिजे? काय नको करु? याबद्दल आवर्जून सांगत असते”.      

Tags: marathi entertainment newsshivani rangoletula shikvin changlach dhada
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Bollywood actress Chahat Khanna is getting married to Rohan Gandotra rumours viral on social media

दोन संसार मोडल्यानंतर ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत, पूर्वाश्रमीच्या पतीवर शारीरिक संबंध व हिंसाचाराचे आरोप अन्...  

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.