शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विराट कोहली व अनुष्का शर्माची मुलं असणार सगळ्यात श्रीमंत स्टारकिड्स, थक्क करणारी आहे दोघांची कमाई, कसे कमावतात पैसे?

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 1, 2024 | 3:31 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
anushka sharma and virat kohli networth

विराट कोहली व अनुष्का शर्माची मुलं असणार सगळ्यात श्रीमंत स्टारकिड्स, थक्क करणारी आहे दोघांची कमाई, कसे कमावतात पैसे?

नुकताच टी-२० विश्वचषक पार पडला. भारताने या विश्वचषकावर आपले नाव कोरले असून जगभरातून भारतीय संघाचे कौतुक केले जात आहे. संघातील प्रत्येक खेळाडूने या विश्वचषकामध्ये मेहनत घेतली आणि याचे फळ म्हणजे प्रत्येक भारतीयाची मान उंचावली गेली आहे. विराट कोहली हा या संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. २००८ साली त्याने भारतीय संघातून खेळण्यास सुरुवात केली.सध्याच्या घडीला तो सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू म्हणूनही ओळखला जातो. त्याने बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माबरोबर २०१७ साली लग्नगाठ बांधली. त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुलं आहेत. (anushka sharma and virat kohli networth)

विराट व अनुष्का ही लोकप्रिय जोडी आहे. त्यांनी ११ डिसेंबर २०१७ रोजी इटलीमध्ये लग्न केले. ‘जिक्यु रिपोर्ट’नुसार भारतातील सर्वात श्रीमंत जोडप्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यांच्या उत्पन्नाचा आकडा समोर आला असून त्यांची मुलंदेखील श्रीमंत स्टारकिड्स असल्याचे म्हंटले जात आहे.

आणखी वाचा – भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची काका राहुल द्रविडसाठी खास पोस्ट, म्हणाली, “माझ्या आयुष्यातील…”

View this post on Instagram

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

‘डीनए’च्या रिपोर्टनुसार, अनुष्का बॉलीवूड अभिनेत्री असल्याने एका चित्रपटासाठी तब्बल ७ कोटी रुपये मानधन घेते. ‘रब ने बनादी जोडी’ या चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर ती अधिक प्रकाशझोतात आली. अनेक ब्रॅंड्स व जाहिरातीच्या माध्यमातून ती सुमारे ५ कोटी ते १० कोटी रुपयांपर्यंत कमाई करते. तसेच एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी ती ९५ लाख रुपये घेते अशीही माहिती मिळाली आहे. तसेच तिचा एक कपड्यांचा ब्रॅंड अडून त्यातूनही तिची कमाई होते.

आणखी वाचा – “घरातील लोकांनीच मला…”, ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीचे आरोप, म्हणाली, “खऱ्या आयुष्यात…”

विराटच्या उत्पन्नाबद्दल बोलायचे झाले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या माध्यमातून बीसीसीआयबरोबर ग्रेड ए+ म्हणून वर्षाला ७ कोटी रुपये कमावतो. तसेच टेस्ट क्रिकेटसाठी १५ लाख रुपये, वनडे साठी ६ लाख रुपये व टी २० साठी ३ लाख रुपये मानधन घेतो. तसेच आयपीएलमध्येही तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोरबरोबर खेळत असून प्रत्येक सीजनला तो १५ कोटी रुपये कमावतो.

खेळाबरोबरच विराट अनेक ब्रॅंड्सचा चेहरादेखील आहे. तो जाहिरातीसाठी ७.५० कोटी रुपये ते १० कोटी रुपयांपर्यंत कमाई करतो. तसेच सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम पोस्टसाठी ८.९ कोटी रुपये तर ट्विटरच्या एका एका पोस्टसाठी २.५ कोटी रुपये घेतो.

Tags: anushka sharmachildrensnetworthvirat kohli
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Mitali Mayekar gave reply to the netizen who said I don't like your eating style is not good.

"खाण्याची पद्धत, ही मुलगीही आवडत नाही", 'त्या' व्हिडीओवर कमेंट करणाऱ्यांना मिताली मयेकरचं उत्तर, म्हणाली, "तुमची कशातच..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.