गुरूवार, सप्टेंबर 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची काका राहुल द्रविडसाठी खास पोस्ट, म्हणाली, “माझ्या आयुष्यातील…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 1, 2024 | 2:20 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
aditi dravid on rahul dravid

भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची काका राहुल द्रविडसाठी खास पोस्ट, म्हणाली, "माझ्या आयुष्यातील…"

टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावत भारतीय संघ ट्रॉफीसह भारतात परतला आहे. तब्बल १७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारताने टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली परफेक्ट संघाने ही मोहिम फत्ते करुन दाखवली आहे. भारतीय संघाने अष्टपैलू कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेवर हा विजय मिळवला आहे. भारताने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाला गवसणी घालण्यात प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा सिंहाचा वाटा आहे. राहुल द्रविड यांनी आजवर त्यांच्या प्रवासात अनेक चढ-उतार पाहिले. मात्र ही लढाई अगदी उत्तमरीत्या पेलवली. (aditi dravid on rahul dravid)

राहुल यांचा हा प्रवास विजेतेपद जिंकल्यानंतरच्या व्हिडीओमध्ये दिसला. भर मैदानात त्यांचे डोळे भरुन आलेले दिसले. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. यानंतर या आनंदाच्या जंगी सेलिब्रेशनची एक पोस्ट मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केली आहे. कारण या मराठमोळ्या अभिनेत्रीचं राहुल द्रविड यांच्याशी खास कनेक्शन आहे. ही खास पोस्ट राहुल द्रविड यांची पुतणी व मराठमोळी अभिनेत्री अदिती द्रविड हिने शेअर केली आहे. टी २० विश्वचषकाची ट्रॉफी रोहित शर्माच्या हातात आली तेव्हा साऱ्यांना अत्यानंद झाला.

आणखी वाचा – “प्रायव्हेट पार्ट दाखवत घाणेरडा इशारा आणि…”, सुप्रसिद्ध गायिकेच्या कॉन्सर्टदरम्यान चाहत्याची घाणेरडी वागणूक, म्हणाली, “हे पाहणे…”

View this post on Instagram

A post shared by Aditi Vinayak Dravid (@aditi_vinayak_dravid)

त्यानंतर ही ट्रॉफी विराट कोहलीच्या हातात आली तेव्हा विराटने मागे उभे असलेल्या राहुल यांना पुढे बोलावत त्यांच्या हातात ही ट्रॉफी सोपवली. यावेळी शांत, संयमी असणाऱ्या राहुल यांचं खूप कौतुक झालं. हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून हा व्हिडीओ राहुल द्रविड यांची पुतणी अदिती द्रविड हिनेदेखील तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करत कौतुक केलं आहे. ही पोस्ट शेअर करत “या माणसासाठी आणि सर्वोत्तम ११ खेळाडूंसाठी इंडिया इंडिया”, असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – ‘ड्रामा ज्युनिअर्स’च्या परीक्षणासाठी संकर्षण कऱ्हाडेच्या नकाराचे कारण आले समोर, खुलासा करत म्हणाला, “मला दडपण होतं पण…”

View this post on Instagram

A post shared by Aditi Vinayak Dravid (@aditi_vinayak_dravid)

तर दुसऱ्या पोस्टमध्ये राहुल द्रविड यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत, “धन्यवाद कोच. तुम्ही त्यांना चांगले प्रशिक्षण दिले, परिपूर्ण शेवट. असेच फेअरवेल त्यांना मिळणे आवश्यक होते. तुमच्यासारखा कोणी नाही. The Wall. माझ्या आयुष्यातील २ सर्वोत्तम माणसांसाठी मी आभारी आहे. अभिमान, आदर आणि प्रेम!”, असं म्हटलं आहे.

Tags: Aditi Dravidaditi dravid on rahul dravidmarathi actressrahul dravid
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
anushka sharma and virat kohli networth

विराट कोहली व अनुष्का शर्माची मुलं असणार सगळ्यात श्रीमंत स्टारकिड्स, थक्क करणारी आहे दोघांची कमाई, कसे कमावतात पैसे?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.