गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“घरातील लोकांनीच मला…”, ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीचे आरोप, म्हणाली, “खऱ्या आयुष्यात…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 1, 2024 | 1:52 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
payal malik on big boss ott 3 elimination

"घरातील लोकांनीच मला...", 'बिग बॉस ओटीटी'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीचे आरोप, म्हणाली, "खऱ्या आयुष्यात..."

सध्या ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाची जोरदार चर्चा सुरु आहे. यावेळी अनेक वादग्रस्त चेहरे या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळत आहेत. युट्यूबर अरमान मालिकदेखील त्याच्या दोन्ही पत्नीबरोबर सहभागी झाला आहे. तिघांच्याही सहभागाने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. सोशल मीडियावर तिघांनाही मोठ्या प्रमाणात ट्रोलदेखील करण्यात आले. कार्यक्रम सुरु झाल्यानंतर अरमान व त्याच्या दोन्ही पत्नीनी त्यांची प्रेमकहाणी सांगितली होती. तसेच त्यानंतर त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खुलासेदेखील केलेले पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा त्यांच्याबद्दलची एक अपडेट समोर आली आहे. (payal malik on big boss ott 3 elimination)

‘बिग बॉस ओटिटी ३’ चं दुसरं एलिमिनेशन झालं आहे. यामध्ये पायल मलिक नॉमिनेट झाली आणि तिला घराबाहेर पडावं लागलं. तिच्या बाहेर पडण्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांनी हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हंटले आहे. अशातच आता स्वतः पायलने एक व्हिडीओ शेअर करत या निर्णयाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.

आणखी वाचा – ‘ड्रामा ज्युनिअर्स’च्या परीक्षणासाठी संकर्षण कऱ्हाडेच्या नकाराचे कारण आले समोर, खुलासा करत म्हणाला, “मला दडपण होतं पण…”

View this post on Instagram

A post shared by Payal Malik (@payal_malik_53)

पायलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिने या व्हिडीओमध्ये सांगितले आहे की, “सर्वांना धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी मला खूप पाठिंबा दिला. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेच की मी घराबाहेर आले आहे. इतकं प्रेम व पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. मी कमी मतांमुळे बाहेर आले नाही तर घरातील लोकांनी मला नॉमिनेट केल्यामुळे मला बाहेर पडावं लागलं आहे. मी जशी खऱ्या आयुष्यात आहे तशीच मी ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात वावरत होते.  मला असाच पाठिंबा देत राहा”.

आणखी वाचा – “प्रायव्हेट पार्ट दाखवत घाणेरडा इशारा आणि…”, सुप्रसिद्ध गायिकेच्या कॉन्सर्टदरम्यान चाहत्याची घाणेरडी वागणूक, म्हणाली, “हे पाहणे…”

पायलच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी तिला पाठिंबा देत बिग बॉसचा हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हंटले आहे. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “कोणा-कोणाला पायलला शोमध्ये पुन्हा पहायला आवडेल? तुम्हाला ट्रॉफी मिळू शकते”. दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “वाइल्ड कार्डमध्ये पायलला कोणाला पाहायला आवडेल?”.

पायल ही युट्यूबर अरमान मलिकची पहिली पत्नी आहे. तिच्या खास मैत्रिणीबरोबरच अरमानने दुसरे लग्न केले. सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात.

Tags: big boss otteliminationott 3payal malik
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Muramba fame Shashank Ketkar expressed his reaction on his political and social issues which shared on social media

“राजकीय नेत्यांच्या भीतीतून बाहेर पडा आणि…”, शशांक केतकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, “धर्म, जात यामध्ये…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.