सध्या विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा हे सध्या खूप चर्चेत असलेले बघायला मिळत आहेत. अभिनय व क्रिकेट सोडून दोघांची एक वेगळी छवी बघायला मिळते. सध्या दोघंही भारताबाहेर स्थायिक झाल्याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु होती. ते नेहमीच देवळात किर्तन ऐकताना बघायला मिळतात. अशातच आता त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अनुष्का व विराट मुलांसहित वृंदावन येथे प्रेमानंद महाराज यांच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी महाराजांबरोबर बोलणंही केलं. मैदानात केलेल्या प्रदर्शनावरुन त्यांनी कोहलीचे कौतुकदेखील केले आहे. त्यांचा आता एक व्हिडीओ समोर आला आहे. (anushka sharma meet premanand maharaj)
अनुष्का व विराट हे मुलगा अकाय व वामिका हे प्रेमानंद महाराज यांना भेटायला गेले होते. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोघांनीही महाराजांना साष्टांग दंडवत घातला. तसेच यावेळी त्यांच्यामध्ये प्रश्न-उत्तरेदेखील झाली. यावेळी अनुष्काने सांगितले की, “गेल्या वेळी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा मनात खूप प्रश्न होते. पण विचारावं की नाही असा प्रश्न पडलं होता. मी मनातल्या मनात तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते.पण जेव्हा तुमचा कार्यक्रम बघायचे तेव्हा कोणी ना कोणी काही प्रश्न विचारत होते”.
Virat Kohli और Anushka Sharma की पूज्य महाराज जी से क्या वार्ता हुई ? Bhajan Marg pic.twitter.com/WyKxChE8mC
— Bhajan Marg (@RadhaKeliKunj) January 10, 2025
तसेच पुढे ती म्हणाली की, “महाराज मला फक्त तुमची प्रेम भक्ती हवी”. दरम्यान हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का-विराट यांच्याबरोबरच अकाय व वामिकादेखील दिसून आले. या व्हिडीओला चाहत्यांचीदेखील खूप पसंती मिळाली आहे.
आणखी वाचा – बायकोच्या डोहाळ जेवणालाही जाऊ शकला नाही संग्राम साळवी, म्हणाला, “वाईट वाटलं पण…”
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्न झाले होते. दोघांच्या लग्नाआधी कोणालाच सुगावा लागला नाही आणि इटलीतील टस्कनी येथे झालेल्या या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर आले. या लग्नाला फक्त त्याचे कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित होते. अनुष्काने ११ जानेवारी २०२१ रोजी एका मुलीला जन्म दिला, तिचे नाव तिने वामिका ठेवले. मुलीच्या जन्मानंतर दोन वर्षांनी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी मुलगा अकायचा जन्म झाला. अनुष्काने लंडनमध्ये मुलाला जन्म दिला आणि गरोदरपणात ती बहुतांश वेळ तिथेच राहिली.