बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याचा चित्रपट ‘स्काय फोर्स’मुळे अधिक चर्चेत आला आहे. या चित्रपटाला चाहत्यांची खूप पसंतीदेखील मिळाली आहे. अक्षय ट्विंकलबरोबर लग्नबंधनात अडकला. ट्विंकल अनेक चित्रपटांमध्ये भूमिकादेखील साकारल्या. मात्र तिला हवे तसे यश मात्र मिळू शकले नाही. नंतर तिने लेखिका बनण्याचा निर्णय घेतला. सध्या तिचे नाव आघाडीच्या लेखकांमद्धे घेतलं जातं. ट्विंकल अनेक विषयांवर तिचे मत परखडपणे मांडत असते. तसेच ती अनेकदा ट्रॉलर्सनादेखील जशास तसे उत्तरही देते. दरम्यान तिचे आता एक वक्तव्य मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. यामध्ये तिने एका अभिनेत्याची पत्नी असण्यावरुन भाष्य केले आहे. (twinkle khanna on akshay kumar)
ट्विंकल सध्या एका वृत्तपत्रामध्ये कॉलम लिहिते. तिने आता लिहिले की, “मी एका अभिनेत्याची पत्नी आहे त्यामुळे मला कसं वाटतं? असा प्रश्न अनेकदा विचारण्यात येतो. तेव्हा उत्तर देताना असं वाटतं की रिपोर्टच्या बोटावरच हल्ला करावा. पण नंतर मी शांततेत उत्तर देते. कारण स्टार पत्नी असं काही असतं असं मला वाटत नाही”. पुढे तिने लिहिले की, “या व्यतिरिक्त माझ्या व अक्षयच्या राजकीय विचारांबद्दलही प्रश्न उपस्थित केले जातात. असे प्रश्न ऐकून मला वाटतं की तो माझा नवरा नाही मुलगा आहे. जो माझं प्रत्येक म्हणणं ऐकतो. जसं मीच त्याला सांगणार की बाळा रस्त्याच्या डाव्या बाजूने चाललास तर मी एक फ्रूटी देइन”.
दरम्यान अक्षयचा सध्या ‘स्काय फोर्स’ हा चित्रपट खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटामध्ये अक्षयबरोबर वीर पहारियादेखील दिसून येणार आहे. वीरचे हा पहिला चित्रपट असून मनोरंजन क्षेत्रात त्याने पदार्पण केले आहे. या चित्रपटात सारा अली खानची महत्त्वपूर्ण भूमिका असलेलीदेखील बघायला मिळत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
खासगी आयुष्यामध्ये ट्विंकल तिच्या मुलांबरोबर शक्य तितका वेळ घालवत असते. सध्या मनोरंजनसृष्टीपासून दूर असली तरीही अक्षयला ती अधिक पाठिंबा देताना दिसते. दोघांचे अनेक फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.