दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना सध्या खूप चर्चेत आहे. विकी कौशलची मुख्य भूमिका असणारा ‘छावा’ या चित्रपटामध्ये रश्मिकादेखील मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला चाहत्यांची खूप पसंती मिळाली आहे. हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार येणार आहे. याबरोबरच ती सलमान खानबरोबर ‘सिकंदर’ या चित्रपटाच्या चित्रिकरणामध्येही व्यस्त आहे. दरम्यान या चित्रिकरणावेळी रश्मिकाला गंभीर दुखापत झाली होती . तिला आता काही दिवस पूर्णपणे आराम करण्यास सांगितले आहे. ‘छावा’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या वेळीदेखील ती दुखापत असतानाही हजर राहिली होती. यावेळी ती खूपच सुंदर दिसत होती. (rashmika mandna relationship status)
रश्मिका व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेही अधिक चर्चेत असलेली बघायला मिळते. दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाबरोबर अनेकदा तिचे नाव जोडले आहे. मात्र याबद्दल दोघांनीही याबद्दल कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नव्हते. मात्र रश्मिकाची एक मुलाखत व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये तिने स्वतः सिंगल नसल्याचे सांगितले आहे. तिचा पार्टनर असून रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासादेखील तिने केला होता. रश्मिकाने ‘हॉलिवूड रिपोर्टर’बरोबर संवाद साधला. यावेळी तिने याबद्दल माहिती दिली. तिला विचारले की, “आयुष्यातील ‘हॅप्पी प्लेस’ कोणते आहे? तसेच तू कुठे खुश असतेस?” असे विचारण्यात आले.
या प्रश्नावर तिने उत्तर दिले की, “घर. माझ्यासाठी घरच माझी हॅप्पी प्लेस आहे. मला त्या ठिकाणी स्थैर्य मिळते. मला वाटतं की मी माझ्या मुळाशी जोडले गेले आहे. यश-अपयश मिळत राहते. पण हे नेहमीसाठी नाही. प्रसिद्धी आपल्या जागी पण मी अजूनही एक मुलगी, बहीण व एक पार्टनर आहे. मी अजूनही खासगी आयुष्याचा सन्मान करते जे माझ्याकडे आहे”. रश्मिकाच्या तोंडून पार्टनर ऐकून चाहते खूप खुश झाले आहेत. त्यामुळे रश्मिका खरच रिलेशनशिपमध्ये आहे का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
रश्मिका व विजय यांच्या अफेअरची चर्चा गेले दोन वर्ष सुरु आहे. गेल्या वर्षी रश्मिकाने विजयच्या कुटुंबासमवेत दिवाळीदेखील साजरी केली होती. तसेच ‘पुष्पा २’ प्रदर्शित झाला तेव्हा रश्मिका विजयच्या कुटुंबाबरोबर दिवाळी साजरी करताना दिसली. त्यामुळे रश्मिका व विजय याच्या नात्याबद्दल चर्चा सुरु आहे.