सध्या सलमान खान अधिक चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे जवळचे मित्र व राजकिय नेते बाबा सिद्दीकी यांची बिश्नोइ गॅंगकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सलमानबरोबरच त्याचे कुटुंबदेखील अधिक चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी मलायकाच्या वडिलांनी राहत्या घराच्या बाल्कनीमधून उडी घेत आत्महत्या केली होती. त्यावेळी तिचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान सर्वात आधी पोहोचला होता. त्यानंतर सलमानचे सगळे कुटुंबियदेखील मलायकाचे सांत्वन करण्यासाठीही पोहोचले. २०१७ साली मलायका व सलमानचा भाऊ अरबाज यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर पहिल्यांदाच मालायकाबरोबर संपूर्ण कुटुंबीय दिसून आले होते. याबद्दल सोहेल खानची पूर्वाश्रमीची पत्नी सीमा सचदेवने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. (seema sachdev on salman khan)
मलायका व अरबाज यांनी १९९८ साली लग्न केले होते. सात वर्षांपूर्वी त्यांचा घटस्फोटदेखील झाला. भावाच्या घटस्फोटानंतर मलायकाच्या वडिलांच्या मृत्यूनंतर सलमान पाहिल्यांदाच मलायकाला भेटला होता. जेव्हा वाईट वेळ होती तेव्हा सलमान मलायकाला आधार देण्यासाठी पोहोचला होता. हे सर्व बघून व ऐकून सीमा एकदम भावुक झाली होती.
याबद्दल तिने ‘न्यूज १८’बरोबर बोलताना सांगितले की, “सलमान एका दगडासारखा आहे. पण जेव्हा तुम्ही संकटात असता किंवा तुम्हाला कसलीही गरज असते तेव्हा तो नेहमी मदतीसाठी हजर असतो. त्यांच्यामुळे कुटुंबं अधिक जवळ येते”.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानलादेखील जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या सगळ्याला न घाबरता स्वतःपेक्षा अधिक कुटुंबाला व जवळच्या मित्रांबद्दल सलमान विचार करतो. दरम्यान सीमा सचदेवबद्दल सांगायचे झाले तर, सोहेल व सीमा यांचा २०२२ साली घटस्फोट झाला. सध्या ती विक्रम आहुजाला डेट करत आहे. सोहेलबरोबर लग्न होण्याआधी तिचं विक्रमबरोबर साखरपुडा झाला होता. नुकतीच ती Fabulous Lives VS Bollywood Wives मध्ये दिसून येत आहे.