Ranbir-Alia daughter viral video : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री आलिया भट्ट हे नेहमी चर्चेत असतात. दोघंही मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय कलाकार आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम करुन अभिनय क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र दोघाप्रमाणेच त्यांची मुलगी राहादेखील सतत चर्चेत असलेली पाहायला मिळते. राहाचे अनेक गोंडस फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळतात. रणबीर व आलियसह ती नेहमी दिसून येते. यावेळी सगळेच जण राहाची एक झलक कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी धावपळ करताना दिसून येतात.
रणबीर व आलियाच्या लाडक्या लेकीचा पुन्हा एकदा एक व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी ती आई-बाबाबरोबर नाही तर आजी सोनी राजदानबरोबर दिसून येत आहे. गाडीमधून राहा आजीबरोबर बाहेर जाताना दिसत आहे. तसेच एखाद्या लहान मुलाप्रमाणेच कारच्या खिडकीतून बाहेर वाकून बघण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या कॅमेरामन तिचे फोटो काढण्यासाठी पुढे येतात. मात्र सोनी यांचे कॅमेरामॅवर लक्ष जाताच त्या राहाला आत घेतात आणि तिला झाकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
सोनी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, “इतकं तर रणबीर व आलियादेखील करत नाहीत”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “आई-वडिलांपेक्षा आजीच जास्त नातीला लपवत आहे”, तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे की, “असं वाटत आहे की राहाला मनोरंजनसृष्टीमध्ये येऊ देणार नाहीत”. तसेच अजून एकाने लिहिले की, “ही तर दुसरी जया बच्चन आहे”.
दरम्यान बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे त्यांच्या मुलांचा चेहरा माध्यमांसमोर आणत नाहीत. मात्र रणबीर व आलियाने असं केलं नाही. राहा जेव्हा एक वर्षाची झाली तेव्हा ख्रिसमसच्या वेळी पहिल्यांदाच मुलीला माध्यमांसमोर आणले होते. त्यावेळी राहाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.