बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट व रणबीर कपूर ही लोकप्रिय जोडी आहे. दोघंही मनोरंजन क्षेत्रातील आघाडीचे कलाकार आहेत. दोन वर्षांपूर्वी ते लग्नबंधनात अडकले. त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहेत. आलिया ही स्वतः मोठ्या खवय्यी आहे. रणबीरला देखील खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला आवडतो. आता त्यांचे वैयक्तिक शेफ सूर्यांश सिंह कंवर यांनी गेल्या काही दिवसांपासून काय काय बनवले? याचे फोटो शेअर केले आहेत. नुकतीच त्याने सोशल मीडियावर आलिया व रणबीर यांच्या बरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. (alia bhatt and ranbir food)
त्याने फोटो शेअर करत लिहिले की, “गेल्या काही दिवसांमध्ये रणबीर कपूर व आलिया भट्ट यांच्यासाठी चांगलं बनवलं आहे. या प्रिय जोडीसाठी काम करुन खूप छान वाटत आहे”. त्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये डोसा, सूप, ऑमलेट, मच्छी, मांस, कैलामरी व पनीरसहित अनेक पदार्थ दिसून येत आहेत. गोडामध्ये खीर-चपाती व केळ्यापासून बनवलेली होती. तसेच यामध्ये आलियाची मांजर एडवर्डदेखील दिसली. या पोस्टवर नेटकऱ्यांनीदेखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका नेटकऱ्याने लिहिले की, “खूप चांगले काम, शेफ”, दुसऱ्या एकाने लिहिले की, “मस्त, खूप छान दिसतंय”, तसेच अजून एकाने लिहिले की, “हे खूप गोड दिसतात. तसेच खूप फिटपण दिसत आहेत. जे बनवलं आहे त्याची लिस्टपण द्या”. रणबीर कपूरच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, तो याआधी संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘एनिमल’ या चित्रपटामध्ये दिसून आला होता. यामध्ये त्याच्याबरोबर अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदना व तृप्ती डिमरीदेखील दिसून आले होते. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्येही तो दिसणार आहे. तसेच संजय लीला भन्साळीच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटामध्येही दिसून येणार आहे. यामध्ये आलिया व विक्की कौशलदेखील दिसून येणार आहे.
आलियादेखील ‘जिगरा’ या चित्रपटामध्ये दिसून येणार आहे. हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये वेदांग रैनादेखील दिसून येणार आहे.