शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुलगी झाली हो! ‘मिर्झापूर’च्या गुड्डूभैय्याच्या घरी चिमुकलीचे आगमन, रिचा चड्ढाने दिला गोंडस मुलीला जन्म

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 18, 2024 | 5:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood actress actress Richa Chadha and actor Ali Fazal blessed with daughter know more

मुलगी झाली हो! ‘मिर्झापूर’च्या गुड्डूभैय्याच्या घरी चिमुकलीचे आगमन, रिचा चड्ढाने दिला गोंडस मुलीला जन्म

बॉलिवूड अभिनेत्री अभिनेत्री रिचा चड्ढा  व अली फजल यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. अभिनेत्री रिचा चढ्ढा व अली फजल या जोडीने चाहत्यांबरोबर ही गूडन्यूज शेअर केली आहे. अभिनेत्री रिचा चढ्ढाने १६ जुलै रोजी बाळाला जन्म दिला. यामुळे आता अभिनेत्री रिचा चड्ढा  व अभिनेता अली फजल आई-बाबा झाले आहेत. अभिनेत्री रिचा चढ्ढा आणि अली फजल आता बॉलिवूडमधील नवीन सेलिब्रिटी पालक बनले आहेत.

नुकतंच, या जोडप्याने त्यांच्या पहिल्या बाळाच्या आगमनापूर्वी मॅटर्निटी फोटोशूट करत सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. आता त्यांनी बाळाच्या आगमनाची गोड बातमी शेअर केली आहे. रिचा व अली या जोडप्याला मंगळवारी मुलगी झाली. काही दिवसांपूर्वीच रिचा चड्ढाने प्रसूतीची वाट पाहत असताना तिच्या बाळाला ‘आजा यार’ म्हणत सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली होती.

View this post on Instagram

A post shared by Richa Chadha (@therichachadha)

आणखी वाचा – रीलच्या नादात आयुष्य गमावलं, ३०० फूट खोल दरीत कोसळल्याने प्रसिद्ध इन्फ्ल्युएन्सरचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

रिचा व अली पहिल्यांदाच आई-बाबा झाले असून, अभिनेत्रीने लेटेस्ट पोस्टमध्ये सुंदर असे ४ फोटो शेअर केले आहेत. ज्यामधील एका फोटोत तिने बेबी बम्पवर हात ठेवून हार्टशेप तयार केला होता, तर फोटोंमध्ये अलीने तिच्या बेबी बम्पवर हात ठेवलेला पाहायला मिळाला. पोस्टच्या कॅप्शनमध्ये रिचाने या प्रवासात साथीदार बनून नेहमी पाठिशी असणाऱ्या अलीचे आभार मानले. तसेच तिने फोटोशूट करणाऱ्या फोटोग्राफरचेही या पोस्टमधून आभार मानले होते.

आणखी वाचा – “आपलं दु:ख, त्रास, बाजूला ठेऊन…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीची वाढदिवसानिमित्त बाबांबद्दल भावुक पोस्ट, म्हणाली, “तडजोड करुन…”

दरम्यान, रिचा चड्ढा  व अली फजल यांनी ४ ऑक्टोबर २०२२ रोजी एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली होती. त्यांनी दिल्लीत त्यांच्या लग्नाचा प्री-वेडिंग सोहळा केला होता. त्यानंतर लखनऊमध्ये मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांचा भव्य विवाहसोहळा पार पडला. मग रिचा-अलीने मुंबईत रिसेप्शन पार्टीही आयोजित केली होती.

Tags: Richa ChadhaRicha Chadha DaughterRicha Chadha Daughter News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Janhvi Kapoor Hospitalised

अंबानीच्या लग्नानंतर जान्हवी कपूर हॉस्पिटलमध्ये दाखल, खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणं पडलं महागात आणि…; नेमकं काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.