सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या हृदयविकाराच्या समस्या होत्या. उपचारासाठी त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र रविवारी उशिरा त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आले आहे. झाकीर यांच्या निधनाने भारतीय संगीत विश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. देशातील अनेक कलाकारांनी झाकीर यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. तसेच अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. बॉलिवूडमधील कलाकारांनी मनोरंजनविश्वात पोकळी निर्माण झाल्याचेदेखील म्हंटले आहे. जाणून घेऊया कोणता कलाकार काय म्हणाला आहे ते? (bollywood actors on zakir hussain)
झाकीर यांचे मनोरंजन क्षेत्रात खूप मोठे स्थान होते. त्यांनी भारतीय संगीताला संपूर्ण जगभरात स्थान दिले होते. त्यांच्या तबलावादनाने भारतीय सांगितला मोठी प्रेरणादेखील मिळाली आहे. अशा दिग्गज व्यक्तीला श्रद्धांजली वाहण्यासाठी पुढे आले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर, रणवीर सिंह अशा कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता अक्षय कुमारने ‘एक्स’ या युट्यूब चॅनलवर लिहिले की, “उस्ताद झाकीर खान साहेबांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दु:ख झाले. ते आपल्या देशातील संगीताचा वारसा पुढे नेत होते. संगीतक्षेत्रातील एक अनमोल रत्न होते. ओम शांती”.
Very pained to know about the sad demise of Ustad Zakir Hussain Saab. He was truly a treasure for our country’s musical heritage. Om Shanti 🙏 pic.twitter.com/a5TWDMymfZ
— Akshay Kumar (@akshaykumar) December 16, 2024
त्यानंतर अभिनेत्री करीना कपूरनेदेखील इन्स्टाग्राम स्टोरीवर जुना फोटो शेअर केला आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे वडील रणधीर कपूरदेखील दिसून येत आहेत. या फोटोमध्ये झाकीर व रणधीर एकमेकांची हसून हस्तांदोलन करताना दिसत आहे. करीनाने हा फोटो शेअर करत ‘मास्त्रो फॉरएव्हर’ असे लिहिले आहेत. तसेच रणवीर सिंहने झाकीर यांचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये ते तबला वाजवताना दिसत आहेत. तसेच हात जोडण्याची इमोजी लावत श्रद्धांजली वाहिली आहे.
दिल ना जाने कब तक उदास रहने वाला है! आवाज़ ना जाने कब तक खामोश रहने वाली है!! अलविदा मेरे दोस्त।इस दुनिया से गए हो! यादों में सदियों तक रहने वाले हो! तुम भी… तुम्हारा हुनर भी… और तुम्हारी दिल की गहराइयों तक छू जाने वाली बच्चों जैसी मुस्कुराहट भी!!💔💔💔#ZakirHussain #Tabla… pic.twitter.com/QtNgwSUVuD
— Anupam Kher (@AnupamPKher) December 15, 2024
अनुपम खेर यांनी श्रद्धांजली देत लिहिले की, “माहीत नाही मन कधीपर्यंत उदास राहणार आहे. माहीत नाही आवाज कधीपर्यंत शांत राहणार आहे. अलविदा मित्रा. या जगातून गेला आहेस. पण नेहमीच तू आठवणीत राहणार आहेस. तू आणि तुझी कलादेखील. तसेच तुझं लहान मुलासारखं हास्यदेखील लक्षात राहणार आहे”. तसेच अभिनेत्री निमरत कौरने फोटो शेअर करत लिहिले की, “२८ फेब्रुवारी २०२४ रोजी मी पृथ्वी थिएटरमध्ये शेवटचे पाहिले. त्यावेळी त्यांच्या तबला वादनाने आम्हा सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. अशा थोर कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली”. दरम्यान झाकीर यांच्या निधनाने कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.