‘कलर्स मराठी वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक गालिका म्हणजे ‘जीव माझा गुंतला’. या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अंतरा-मल्हार जोडी सुपरहिट झाली. ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत योगिता चव्हाणबरोबर या मालिकेत अभिनेता सौरभ चौघुलेदेखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला. या मालिकेनंतर अंतरा-मल्हार म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुले यांनी एकमेकांबरोबर लग्न करत आयुष्यभराचे जीवनसाथी झाले. ३ मार्च २०२४ रोजी दोघांनी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. (Saorabh Choughule Birthday)
योगिता व सौरभ यांच्या बॉण्डिंगची सोशल मीडियावर कायमच चर्चा असते. अभिनेता सौरभ चौघुलेचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त योगिताने नवऱ्यासाठी एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. अभिनेत्री योगिता चव्हाणने तिचा नवरा सौरभ चौघुलेसाठी इन्स्टाग्रामवर रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. लाडक्या नवऱ्याबरोबरचा खास व्हिडीओ पोस्ट करत “जिंदगी से बस एक ही गिला है मुझे की तू बहुत देर से मिला है मुझे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा” असं कॅप्शनही लिहिलं आहे.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन अजूनही जिवंत?, कुटुंबियांकडून मोठी माहिती, म्हणाले, “उपचार सुरु आहेत आणि…”
या व्हिडीओमध्ये योगिताने सौरभबरोबरचे काही खास क्षण शेअर केले आहेत. नवरा-बायको म्हणून एकमेकांबरोबरचे काही खास क्षण योगिताने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत. यात ते दोघे काही खाताना दिसत आहेत. तर कुठे दोघे फिरायला गेल्याचे पाहायला मिळत आहे. तर एके ठिकाणी सौरभ जेवण करताना आणि तिच्या हातावर मेहंदी काढतानाचेही दिसत आहे. एकूणच योगिताने दोघांचे काही खास क्षण सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
योगिताने शेअर केलेल्या या व्हिडीओवर निखिल दामले, रेश्मा शिंदे, चिन्मयी साळवी, संग्राम समेळ, ऐश्वर्या शेटे यांसारख्या कलाकारांनी प्रतिक्रिया देत अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, सौरभ चौघुलेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘जीव माझा गुंतला’ मालिकानंतर ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरी’ मालिकेत दिसला. या मालिकेत अभिनेत्याने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.