Allu Arjun Statement : तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुन आपल्या कुटुंब व मित्रांसह वेळ घालवत आहे. कुटुंबाच्या भेटीदरम्यानचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. यावेळी अभिनेत्याला पाहून सोशल मीडियावर लोक संतापले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही ‘पुष्पा 2’ स्टार मृत महिलेच्या कुटुंबीयांना भेटला नाही किंवा जखमी मुलाला भेटायलाही आला नाही, याबद्दल नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. यावर आता अल्लू अर्जुनने प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मृत महिलेचा मुलगा श्री तेज यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मृत महिलेच्या कुटुंबीयांना दिलेल्या वचनाला आपण ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले
अल्लू अर्जुन म्हणाला की, त्यांनी मृत महिलेच्या कुटुंबाला दिलेली जबाबदारी पूर्ण करणार आहे. मात्र कायदेशीर कारवाईमुळे त्याला मृत महिलेच्या कुटुंबीयांना आणि मुलाला भेटू दिले जात नाही. संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा २’ च्या स्क्रिनिंगदरम्यान चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी अल्लू अर्जुनला १३ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. पत्नीच्या मृत्यूला अभिनेता जबाबदार असल्याचा आरोप करत मृत महिलेच्या पतीच्या वतीने अल्लू अर्जुनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आणखी वाचा – आधी हिंदू आणि आता ख्रिश्चन रितीरिवाजांनुसार लग्नबंधनात अडकली कीर्ती सुरेश, पतीबरोबरचे रोमँटिक फोटो समोर
अल्लू अर्जुन न सांगता चित्रपटगृहात पोहोचल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे लोकांच्या प्रचंड गर्दीत चेंगराचेंगरी झाली. गुदमरल्यामुळे अनेकजण बेशुद्ध झाले. यामध्ये रेवती नावाच्या महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा मुलगा श्रीतेज याचीही प्रकृती चिंताजनक आहे. श्रीतेज याची प्रकृती अजून चिंताजनक असून तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुन त्याला भेटायलाही गेला नाही, यावर सोशल मीडियावर बरीच टीका झाली. आता अल्लू अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याबाबत एक पोस्ट केली आहे. त्याने लिहिले की, “त्या दुर्दैवी घटनेनंतर सध्या उपचार घेत असलेल्या छोट्या श्रीतेजबद्दल मी चिंतेत आहे. सध्या सुरु असलेल्या कायदेशीर कारवाईमुळे मला श्रीतेज आणि त्याच्या कुटुंबीयांना भेटू नका, असा सल्ला देण्यात आला आहे”.
अल्लू अर्जुनने पुढे लिहिले की, “माझ्या प्रार्थना त्याच्याबरोबर कायम आहेत आणि श्रीतेजच्या उपचाराचा खर्च मी उचलेन आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारेन, ही जबाबदारी मी निश्चितपणे पार पाडेन. तो लवकर बरा व्हावा आणि श्रीतेज आणि त्याच्या कुटुंबाला लवकरात लवकर भेटता यावे, अशी मी प्रार्थना करतो”.