एकीकडे अभिनेता विक्रांत मेस्सीने अभिनयाला राम राम केला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल त्याने माहिती दिली. विक्रांतच्या या निर्णयाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. मनोरंजन क्षेत्रात एकाच खळबळ उडाली आहे. अनेक कलाकारांनी त्याच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. नुकताच विक्रांतचा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपत प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. बॉक्सऑफिसवर या चित्रपटाने चांगलीच कमाल केली होती. आता हा चित्रपट संसद भवनात प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे, २ डिसेंबरला संध्याकाळी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला सहभागी होणार आहेत. (the sabarmati report special screening)
मिळालेल्या माहितीनुसार, संसद भवन परिसरात बाल योगी सभागृहात २ डिसेंबरच्या संध्याकाळी ७ वाजता ‘द साबरमती रिपोर्ट’चे स्क्रीनिंगमध्ये नरेंद्र मोदी व ओम बिर्लादेखील उपस्थित असणार आहेत. ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट १५ नोव्हेंबर २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट गोध्रा ट्रेन जाळल्याप्रकरणी आहे. या घटणेमध्ये ९० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होतं. तसेच यामुळेगुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात सांप्रदायिक दंगे भडकले होते.
या चित्रपटात विक्रांत मेस्सी, राशी खन्ना, ऋद्धि डोगरा हे कलाकार आहेत. हा चित्रपटाचे लेखन अविनाश व अर्जुन यांनी केले आहे. तसेच असीम अरोरा यांच्या पुस्तकावर आधारित आहे. शोभा कपूर व एकता कपूर या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. दिग्दर्शन रंजन चंदेल यांनी केले आहे. ओडिसा, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश व गुजरात या राज्यांमध्ये टॅक्स फ्री घोषित केला होता. या चित्रपटाला संपूर्ण देशभरात खूप पसंती मिळाली.
विक्रांतच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटचा ‘सेक्टर ३६’ या चित्रपटात दिसला होता. ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ आणि ‘ब्लॅकआउट’मध्येही त्याने काम केले. विक्रांतची सर्वाधिक चर्चा ’12 th फेल’ चित्रपटामुळे झाली. या चित्रपटात तो मनोज कुमार शर्माच्या भूमिकेत होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन विधू विनोद चोप्रा यांनी केले होते. आता विक्रांतच्या हातात ‘यार जिगरी’, ‘टीएमई’ आणि ‘आँखों की गुस्ताखियां’सारखे चित्रपट आहेत. त्यांचे शूटिंग सुरु असून काही पोस्ट प्रॉडक्शनमध्ये आहेत.