सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

विक्रांत मेस्सीच्या निर्णयानंतर लगेचच संसद भवनात ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाचे खास स्क्रिनिंग, पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 2, 2024 | 4:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
the sabarmati report special screening

संसद भवनात 'द सायबरमती रिपोर्ट'चे स्पेशल स्क्रिनिंग

एकीकडे अभिनेता विक्रांत मेस्सीने अभिनयाला राम राम केला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल त्याने माहिती दिली. विक्रांतच्या या निर्णयाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. मनोरंजन क्षेत्रात एकाच खळबळ उडाली आहे. अनेक कलाकारांनी त्याच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. नुकताच विक्रांतचा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपत प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. बॉक्सऑफिसवर या चित्रपटाने चांगलीच कमाल केली होती. आता हा चित्रपट संसद भवनात प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे, २ डिसेंबरला संध्याकाळी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला सहभागी होणार आहेत. (the sabarmati report special screening)

मिळालेल्या माहितीनुसार, संसद भवन परिसरात बाल योगी सभागृहात २ डिसेंबरच्या संध्याकाळी ७ वाजता ‘द साबरमती रिपोर्ट’चे स्क्रीनिंगमध्ये नरेंद्र मोदी व ओम बिर्लादेखील उपस्थित असणार आहेत. ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट १५ नोव्हेंबर २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. हा चित्रपट गोध्रा ट्रेन जाळल्याप्रकरणी आहे. या घटणेमध्ये ९० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होतं. तसेच यामुळेगुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात सांप्रदायिक दंगे भडकले होते.

आणखी वाचा – ‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाची जय्यत तयारी, निसर्गरम्य वातावरणात Bride To Be Party, फोटो व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Vikrant Massey (@vikrantmassey)

या चित्रपटात विक्रांत मेस्सी, राशी खन्ना, ऋद्धि डोगरा हे कलाकार आहेत. हा चित्रपटाचे लेखन अविनाश व अर्जुन यांनी केले आहे. तसेच असीम अरोरा यांच्या पुस्तकावर आधारित आहे. शोभा कपूर व एकता कपूर या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. दिग्दर्शन रंजन चंदेल यांनी केले आहे. ओडिसा, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश व गुजरात या राज्यांमध्ये टॅक्स फ्री घोषित केला होता. या चित्रपटाला संपूर्ण देशभरात खूप पसंती मिळाली.

आणखी वाचा – Tula Shikvin Changlach Dhada : भुवनेश्वरीचं सत्य समोर आणण्यात अक्षरा यशस्वी, तरीही लेकासाठी चारुहास लग्न करणार का?

विक्रांतच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटचा ‘सेक्टर ३६’ या चित्रपटात दिसला होता. ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ आणि ‘ब्लॅकआउट’मध्येही त्याने काम केले. विक्रांतची सर्वाधिक चर्चा ’12 th फेल’ चित्रपटामुळे झाली. या चित्रपटात तो मनोज कुमार शर्माच्या भूमिकेत होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन विधू विनोद चोप्रा यांनी केले होते. आता विक्रांतच्या हातात ‘यार जिगरी’, ‘टीएमई’ आणि ‘आँखों की गुस्ताखियां’सारखे चित्रपट आहेत. त्यांचे शूटिंग सुरु असून काही पोस्ट प्रॉडक्शनमध्ये आहेत.

Tags: pm narendra modithe sabarmati reportvirkant massey
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
Reshma Shinde Birthday

नवऱ्यासह देवदर्शन करत आहे रेश्मा शिंदे, साऊथ इंडियन लूकने वेधलं सर्वाधिक लक्ष, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.