Vikrant Massey Net Worth :विक्रांत मॅसीने आपल्या अभिनय कारकिर्दीला टेलिव्हिजन विश्वापासून सुरुवात केली आणि नंतर त्याने बॉलिवूड व ओटीटी विश्वात स्वतःची ओळख निर्माण केली. यशाच्या शिखरावर असताना बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीने आज सकाळी अभिनयातून निवृत्ती जाहीर केली. अभिनेत्याने केलेल्या या घोषणेने सर्वत्र नाराजीचा व काळजीचा सूर उमटलेला पाहायला मिळाला. 12 th fail अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आणि सांगितले की, आता त्याला पती, वडील आणि मुलगा म्हणून घरी परत जाण्याची इच्छा आहे. २०२५ मध्ये प्रदर्शित होणारे त्याचे दोन चित्रपट हे त्याचे शेवटचे चित्रपट असतील असेही विक्रांतने शेअर केले. याबरोबरच अभिनेत्याची लाइफस्टाइल आणि नेटवर्थ यांचीही चर्चा सर्वत्र होत आहे. सध्या, अभिनेता त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट गोधरा घटनेवर आधारित आहे. विक्रांतने आतापर्यंतच्या कारकिर्दीत प्रसिद्धीबरोबरच भरपूर संपत्तीही कमावली आहे. अभिनेत्याकडे अनेक महागड्या वस्तूही आहेत.
‘ई टाइम्स’च्या वृत्तानुसार, विक्रांतची एकूण संपत्ती २० कोटी ते २६ कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. अभिनेता प्रत्येक प्रोजेक्टसाठी एक कोटी ते दोन कोटी रुपये घेतो. विक्रांतची बहुतेक कमाई चित्रपट आणि वेब शो तसेच ब्रँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडिया हँडलमधून येते. २०२० मध्ये, विक्रांतने मुंबईत एक आलिशान सी-फेसिंग घर विकत घेतले. येथे तो पत्नी शीतल ठाकूर आणि मुलगा वरदानबरोबर राहतो. यापूर्वी त्याने ‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते, “माझ्या समोर समुद्र आहे. हे १८० डिग्री समुद्राचे दृश्य आहे जिथे मी दररोज निसर्गाची कला पाहतो”.
विक्रांतकडे १.१६ कोटी रुपयांची मर्सिडीज बेंझ जीएलएस, ६० लाख रुपयांची व्होल्वो एस90 आणि मारुती स्विफ्ट डिझायर या अनेक लक्झरी कार आहेत. एवढेच नाही तर त्याच्याकडे १२ लाख रुपयांची डुकाटी मॉन्स्टर मोटरसायकलही आहे. विक्रांतच्या बाईक कलेक्शनमध्ये १२.३५ लाख रुपयांची ट्रायम्फ बोनविले बॉबर बाइक देखील आहे. विक्रांत अत्यंत आलिशान व जीवनदायी आयुष्य जगतो. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या नोटमध्ये त्याने लिहिले की, “गेली काही वर्षे आणि त्याआधीचा काळ आश्चर्यकारक होता. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो ज्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला, परंतु जसजसे मी पुढे जात आहे तसतसे मला जाणवले की एक पती, वडील, मुलगा आणि एक अभिनेता म्हणूनही आता स्वतःला साजेशी आणि घरी परतण्याची वेळ आली आहे”.
पिंकव्हिलाशी बोलताना विक्रांतने या निर्णयाबाबत खूप मोठा खुलासा केला आहे. यावेळी बोलताना विक्रांत म्हणाला की, “या लोकांना माहित आहे की मी नुकताच एका मुलाचा बाप झालो आहे, ज्याला अजून चालताही येत नाही. ते लोक त्याचे नाव ओढत आहेत. मला त्याच्या सुरक्षिततेची काळजी वाटते. आपण कोणत्या समाजात राहत आहोत?”, असा सवालही त्याने यावेळी बोलताना केला.