बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी सध्या खूप चर्चेत आला आहे. नुकताच त्याचा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अभिनेत्याने केलेल्या घोषणेने चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. विक्रांतने अभिनयातून निवृत्ती जाहीर केली आहे. या घोषणेनंतर चाहते दु:खी झाले आहेत. अभिनेत्याच्या चित्रपटसृष्टीला निरोप देण्यामागच्या कारणांबद्दल अनेक तर्क लावले जात आहेत. सध्या विक्रांत मेस्सी ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटामुळे चर्चेत आला. प्रदर्शनानंतर हा चित्रपट अनेक वादात अडकला आहे. विक्रांत चित्रपटात पत्रकाराच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा विक्रांत मेस्सी आणि त्याच्या नऊ महिन्यांच्या मुलाला धमक्या आल्या होत्या. याबद्दल त्याने पोस्ट करत माहिती दिली. (dia mirza on vikrant massey)
दरम्यान विक्रांत चित्रपटसृष्टी सोडणार असल्याची पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्याने लिहिले की, “गेली काही वर्षे आणि त्याआधीचा काळ आश्चर्यकारक होता. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो ज्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला, परंतु जसजसे मी पुढे जात आहे तसतसे मला जाणवले की एक पती, वडील, मुलगा आणि एक अभिनेता म्हणूनही आता स्वतःला साजेशी आणि घरी परतण्याची वेळ आली आहे. २०२५ साली आपण शेवटचे भेटणार आहोत. शेवटचे दोन चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणी. पुन्हा एकदा धन्यवाद प्रत्येक गोष्टीसाठी आणि मध्ये जे काही झालं त्यासाठी मी कायम आभारी राहीन”.
दरम्यान विक्रांतची ही पोस्ट सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेक कलाकारांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. अभिनेत्री दिया मिर्झाने पोस्टवर प्रतिक्रिया देत लिहिले की, “ब्रेक खूप गरजेचा असतो. तू दुसऱ्या क्षेत्रातही चांगले काम करशील”. तसेच अभिनेत्री पायल राजपूतने लिहिले की, “नाही विक्रांत”. तसेच यावर विक्रांतच्या चाहत्यांनीदेखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले की, “तुम्ही असं का करत आहात? बॉलिवूडमध्ये तुमच्यासारखे खूप कमी अभिनेते आहेत. आम्हाला चांगल्या कलाकारांची गरज आहे”. दुसऱ्या एकाने लिहिले की, “तुमचे करियर सध्या खूप चांगले आहे. का असं करत आहात?”.
विक्रांतच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटचा ‘सेक्टर ३६’ या चित्रपटात दिसला होता. ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ आणि ‘ब्लॅकआउट’मध्येही त्याने काम केले. विक्रांतची सर्वाधिक चर्चा ’12 th फेल’ चित्रपटामुळे झाली. या चित्रपटात तो मनोज कुमार शर्माच्या भूमिकेत होता. आता तो ‘यार जिगरी’, ‘टीएमई’ आणि ‘आँखों की गुस्ताखियां’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.