शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझी त्याच्याशी तुलना करणं चुकीचं आणि…”, शाहरुख खानबरोबर विक्रांत मेस्सीचं वैर?, म्हणाला, “खूप चुकीचं…”

Shamal Sawantby Shamal Sawant
नोव्हेंबर 16, 2024 | 5:58 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
vikrant massey on shahrukh khan

विक्रांत मेस्सीची शाहरुख खानबरोबर तुलना

बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी हा सध्या खूप चर्चेत आहेत. ’१२th फेल’ या चित्रपटामुळे त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. सध्या विक्रांतचा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट २००२ साली झालेल्या गोध्रा कांडावर अवलंबून आहे. तसेच याआधीही विक्रांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या भाष्यामुळेही अधिक चर्चेत आला होता. अशातच आता त्याने शाहरुख खानबद्दल भाष्य केले आहे. ज्यामुळे त्याच्याबद्दलची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. शाहरुख खानबरोबर तुलना केल्यानंतर विक्रांतने आपली प्रतिक्रिया दिली असून याबद्दल सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. विक्रांत शाहरुखबद्दल नक्की काय म्हणाला? हे आपण आता जाणून घेऊया. (vikrant massey on shahrukh khan)

विक्रांतने नुकतीच ‘बॉलिवूड बबल’ला मुलाखत दिली. तो म्हणाला की, “माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. जो कोणी बघत आहे किंवा ज्याने कोणी माझ्याबद्दल काही बोललं आहे त्याला मी धन्यवाद म्हणेन. पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पण शाहरुख या क्षेत्रात गेल्या ३५ वर्षांपासून कार्यरत आहेत आणि मला १०-१२ वर्ष झाली आहेत. माझी त्यांच्याशी तुलना करणे चुकीचे आहे. पण मला खूप छान वाटत आहे”.

आणखी वाचा – धक्कादायक! ‘अनुपमा’च्या सेटवर शॉक लागून एका व्यक्तीचा मृत्यू, कलाकार मंडळीही हादरले, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

View this post on Instagram

A post shared by Vikrant Massey (@vikrantmassey)

शाहरुखने टेलिव्हिजनवरुन मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवले. विक्रांतदेखील टेलिव्हिजनवरुनच प्रेक्षकांच्या समोर आला होता. विक्रांतने ‘लुटेरा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो ‘छपाक’, ‘गिन्नी वेड्स सनी’, ‘हसीना दिलरुबा’, ‘१४ फेरे’, ‘गॅसलाइट’ व ’१२th फेल’ या चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. सध्या त्याचा ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून येत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आणखी वाचा – धनुषने १० कोटी रुपयांची कॉपीराईट केस दाखल करताच नयनतारा संतापली, अभिनेत्याला सुनावलं, म्हणाली, “एवढ्या खालचा दर्जा…”

‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट धीरज सरना यांनी दिग्दर्शित केला आहे. तसेच एकता कपूर ही या चित्रपटाची निर्माती आहे. यामध्ये विक्रांतबरोबर राशी खन्ना व ऋद्धि डोग्रा या अभिनेत्रीदेखील दिसून येत आहेत. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.    

Tags: shahrukh khanstatementvikrant massey
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Next Post
akshay kumar with pm modi

Video : नरेंद्र मोदी व अक्षय कुमार यांची ग्रेटभेट, पंतप्रधानांनी अभिनेत्याच्या तब्येतीचीही केली विचारपूस, व्हिडीओ तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.