बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी हा सध्या खूप चर्चेत आहेत. ’१२th फेल’ या चित्रपटामुळे त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. सध्या विक्रांतचा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट २००२ साली झालेल्या गोध्रा कांडावर अवलंबून आहे. तसेच याआधीही विक्रांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या भाष्यामुळेही अधिक चर्चेत आला होता. अशातच आता त्याने शाहरुख खानबद्दल भाष्य केले आहे. ज्यामुळे त्याच्याबद्दलची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. शाहरुख खानबरोबर तुलना केल्यानंतर विक्रांतने आपली प्रतिक्रिया दिली असून याबद्दल सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. विक्रांत शाहरुखबद्दल नक्की काय म्हणाला? हे आपण आता जाणून घेऊया. (vikrant massey on shahrukh khan)
विक्रांतने नुकतीच ‘बॉलिवूड बबल’ला मुलाखत दिली. तो म्हणाला की, “माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. जो कोणी बघत आहे किंवा ज्याने कोणी माझ्याबद्दल काही बोललं आहे त्याला मी धन्यवाद म्हणेन. पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पण शाहरुख या क्षेत्रात गेल्या ३५ वर्षांपासून कार्यरत आहेत आणि मला १०-१२ वर्ष झाली आहेत. माझी त्यांच्याशी तुलना करणे चुकीचे आहे. पण मला खूप छान वाटत आहे”.
शाहरुखने टेलिव्हिजनवरुन मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवले. विक्रांतदेखील टेलिव्हिजनवरुनच प्रेक्षकांच्या समोर आला होता. विक्रांतने ‘लुटेरा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तो ‘छपाक’, ‘गिन्नी वेड्स सनी’, ‘हसीना दिलरुबा’, ‘१४ फेरे’, ‘गॅसलाइट’ व ’१२th फेल’ या चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. सध्या त्याचा ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून येत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट धीरज सरना यांनी दिग्दर्शित केला आहे. तसेच एकता कपूर ही या चित्रपटाची निर्माती आहे. यामध्ये विक्रांतबरोबर राशी खन्ना व ऋद्धि डोग्रा या अभिनेत्रीदेखील दिसून येत आहेत. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.