बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा सध्या खूप चर्चेत असतो. अक्षय नुकताच ‘सिंघम अगेन’ चित्रपटात दिसून आला होता. यामध्ये त्याच्याबरोबर अजय देवगण, दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, अर्जुन कपूर असे अनेक कलाकार दिसून आले होते. आता पुन्हा एकदा अक्षय एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे आणि त्याच्याबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चादेखील सुरु आहे. अक्षयचा नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार व नरेंद्र मोदी हे हातमिळवणी करताना दिसत आहेत. अक्षयने हा व्हिडीओ त्याच्या अकाऊंटवरुन शेअर केला आहे. (akshay kumar with pm modi)
दरम्यान अक्षयने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे. तसेच तो नरेंद्र मोदी यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसत आहे. अक्षयने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याने लिहिले की, “आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका कार्यक्रमामध्ये ऐकण्याची संधी मिळाली. त्यांनी भारताच्या विकासासाठी खूप प्रेरणादायक गोष्टी सांगितल्या”.
Akshay sir met Prime minister Narendra Modi At #Htsummit today in New Delhi 🙌#AkshayKumar𓃵#AkshayKumar pic.twitter.com/u2E70XlWv7
— AK Army (@itsakarmy_) November 16, 2024
तसेच अक्षयचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. यामध्ये अक्षय नरेंद्र मोदी यांना भेटताना दिसत आहे. नरेंद्र मोदी अक्षयबरोबर हस्तांदोलन करताना म्हणत आहेत की, “कसे आहात?”, या व्हिडीओवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत तसेच ते अभिनेता व पंतप्रधान मोदी यांचे कौतुकदेखील करत आहेत. याधीही २०१९ साली अक्षयने नरेंद्र मोदी यांची एक मुलाखत घेतली होती. यावेळ अक्षयने पंतप्रधानांना अनेक प्रश्नदेखील विचारले होते. ही मुलाखत अत्यंत हलक्या-फुलक्या स्वरुपाची होती.
Got an opportunity to listen to our PM @narendramodi ji give an inspirational talk about new India’s growth story at the HT Leadership Summit #HTLS2024 pic.twitter.com/QainOTW3Ad
— Akshay Kumar (@akshaykumar) November 16, 2024
अक्षयच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, ‘सिंघम अगेन’ आधी तो ‘स्त्री २’ या चित्रपटातदेखील दिसून आला होता. तसेच ‘खेल खेल मे’मध्येही दिसून आला होता. तसेच आता तो ‘जॉली एल एल बी’, ‘स्काय फोर्स’, ‘हाऊसफुल ५’, ‘कनप्पा’ व ‘हेरा फेरी ३’ यामध्ये तो दिसून येणार आहे.