बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री आलिया भट्ट हे दोघे त्यांची कामामुळे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ व्हायरल होत असतात. या दोघांबरोबरच सोशल मीडियावर त्यांची लेक अर्थात राहा कपूरच्याही चर्चा होताना पाहायला मिळतात. राहा जेव्हा जेव्हा पापाराजींच्या कॅमेऱ्यात कैद होते. तेव्हा तेव्हा ती तिच्या क्युट एक्सप्रेशन्सनी सर्वांचं लक्ष वेधून घेते. अशातच आज रणबीर-आलिया यांच्या लेकीचा म्हणजेच राहाचा दूसरा वाढदिवस आहे. यानिमित्त अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राहाला शुभेच्छा दिल्या आहेत. (Raha Kapoor Birthday)
राहाच्या वाढदिवसानिमित्त आजी नीतू कपूर यांनी तिचा एक अतिशय गोंडस फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राहाचा क्यूट अंदाज पाहायला मिळत आहे. नीतू कपूरने शेअर केलेल्या फोटोमध्ये राहा आई आलिया आणि वडील रणबीर कपूर यांच्यामध्ये कारमध्ये बसलेली आहे. तर रणबीर राहा तिच्या डोक्यावर प्रेमाने चुंबन घेत आहे. या फोटोमध्ये राहाच्या चेहऱ्यावरील हावभाव बघून असे वाटते की ती तिच्या आई-वडिलांमध्ये दडली आहे. राहाचा तिच्या आई-वडिलांबरोबरचा फोटो शेअर करत नीतू यांनी “आमच्या प्रेमाचा वाढदिवस…’Our Pyaar’s Birthday’ असं म्हटलं आहे.
आजीबरोबरच आत्यानेही राहाला वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. रिद्धिमा कपूर साहनीने तिची लेक समाराबरोबरचा राहाचा क्यूट फोटो शेअर केला आहे. यामध्ये राहा गोड स्माइल देताना दिसत आहे. “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा क्यूटी, आम्हा सर्वाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे” असं म्हणत रिद्धिमाने राहाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. नीतू कपूर व रिद्धिमा कपूर यांनी शेअर केलेले हे दोन्ही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या राहाच्या फोटोला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच सोशल मीडियाद्वारे अनेकांनी राहाला शुभेच्छाही दिल्या आहेत.
आणखी वाचा – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’मुळे विकी कौशलला भिती, ‘छावा’ चित्रपटाची माघार, प्रदर्शन पुढे ढकलले
आजीबरोबरच आत्यानेही राहाला वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. रिद्धिमा कपूर साहनीने तिची लेक समाराबरोबरचा राहाचा क्यूट फोटो शेअर केला आहे. यामध्ये राहा गोड स्माइल देताना दिसत आहे. “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा क्यूटी, आम्हा सर्वाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे” असं म्हणत रिद्धिमाने राहाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. नीतू कपूर व रिद्धिमा कपूर यांनी शेअर केलेले हे दोन्ही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी या राहाच्या फोटोला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच सोशल मीडियाद्वारे अनेकांनी राहाला शुभेच्छाही दिल्या आहेत.
दरम्यान, १४ एप्रिल २०२२ रोजी या जोडप्याने लग्नगाठ बांधत आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली. अभिनेत्रीला त्याचवर्षी ६ नोव्हेंबरला कन्यारत्न झालं. पुढे, काही दिवसांनी आलिया-रणबीर यांनी त्यांच्या लाडक्या लेकीचं नाव राहा असं ठेवलं. मग गेल्यावर्षी ख्रिसमिसच्या दिवशी या जोडप्याने राहाचा चेहरा पापाराझींसमोर आणला. यावेळी राहाचे अनेक फोटो सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखे पसरले. यानंतर इंटरनेटवर राहाचा गोंडस अंदाज, तिचे निळे डोळे, गुबगुबीत गाल या खास लूकची चांगलीच चर्चा झाली.