बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते रिओ कपाडिया यांच्या निधनानंतर सगळ्यांनाच दुःखद धक्का बसला. गुरुवारी (१४ सप्टेंबर) रिओ यांचं निधन झालं. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. रिओ यांच्या निधनामधून अजून बॉलिवूड सावरलं नसताना आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध अभिनेते सुनील श्रॉफ यांचं निधन झालं आहे. काही आठवड्यांपूर्वीच त्यांनी डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला होता. सुनील यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. पण सुनील यांच्या मृत्यू मागचं नेमकं कारण काय? हे अद्यापही अस्पष्ट आहे. अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड २’ चित्रपट त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या चित्रपटानिमित्त त्यांना चित्रपटामध्ये शेवटचं पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली.
आणखी वाचा – Rio Kapadia Passes Away : ‘दिल चाहता है’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, मृत्यूचं कारण अजूनही अस्पष्ट
सुनील सोशल मीडियावरही अधिकाधिक सक्रिय होते. इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्यांनी आतापर्यंत विविध व्हिडीओही शेअर केले आहेत. काही व्हिडीओमध्ये जीममध्ये सुनील व्यायाम करताना दिसत आहेत. सुनील यांच्या निधनानंतर बॉलिवूड कलाकारांसह चाहते मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.