बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी हा आपल्या हटके अभिनयाने ओळखले जातात. त्यांची मुलगी अथिया शेट्टीनेदेखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले आहे. तिने काही चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. तिच्या भूमिकांचे अनेकांनी कौतुक केले आहे. काही वर्षांपूर्वी अथिया भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू के. एल. राहुलला डेट करत होती. त्यानंतर २३ जानेवारी २०२३ रोजी दोघेही लग्नबंधनात अडकले. अशातच आता दोघेही आई-वडील बनणार असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरु झाल्या आहेत. याबद्दलचा खुलासा खुद्द सुनील शेट्टी यांनी केला आहे. (suniel shetty on athiya pregnancy )
सध्या सुनील एका डान्स रिॲलिटी शो ‘डान्स दिवाने’चा परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्याबरोबर या शोमध्ये माधुरी दीक्षितदेखील परीक्षक आहे. नुकताच आता आजी-आजोबा स्पेशल एपिसोड आला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती सिंहने केले होते. यावेळी भारतीने सुनील यांना आजोबा झाल्यानंतर कसं वागावं लागेल? तसेच कोणीही लहान मुल इतक्या छान दिसणाऱ्या आजी-आजोबांना नाही सांभाळू शकत नाही असेही म्हणाली. त्यावर सुनील म्हणाले की पुढच्या पर्वामध्ये मी येईन तेव्हा आजोबांप्रमाणे मंचावर चालेन”.
सुनील यांच्या या वाक्याने सर्वांचेच लक्ष वेधले गेले. तसेच त्यांची मुलगी अथिया गरोदर असल्याचेही अंदाज बांधण्यात येऊ लागले. अथिया व के एल राहुल या दोघांनाही आपले नातं खासगी ठेवायला आवडतं. त्यामुळे जर अथिया गरोदर असेल तरीही ते इतक्या लवकर समोर येऊ देणार नाहीत. लग्न झाल्यापासून अथिया कोणत्याही चित्रपटांमध्ये दिसली नाही. तसेच कार्यक्रमांमध्येही खूप कमी दिसून आली. त्यामुळे खरच आथिया गरोदर आहे का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
अथिया व के.एल.राहुल हे खूप महीने एकमेकांना डेट करत होते. मात्र दोघांनी कधीही हे माध्यमांसमोर कबूल केले नाही. सुनील शेट्टी यांनी देखील राहुल व अथियाच्या नात्याला परवानगी दिली. दरम्यान आता सुनील शेट्टी खरच आजोबा होणार का? अशा अनेक चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत.