बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमी चर्चेत असलेला बघायला मिळतो. आजवर शाहरुखने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या सर्वच भूमिकांना प्रेक्षकांची खूप मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. अनेकदा तो वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असलेला दिसून येतो. त्याच्या ऑनस्क्रीन प्रेमाबरोबरच ऑफस्क्रीनदेखील खूप पसंती मिळते. शाहरुख सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. तो सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांशी नेहमी संवाद साधताना दिसतो. दरम्यान शाहरुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख एका चाहतीला प्रपोज करताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांची खूप मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. (shahrukh khan video viral)
दरम्यान समोर आलेला व्हिडीओ एका इव्हेंटमधील आहे. हा इव्हेंट दुबई येथे आयोजित करण्यात आला होता. हा व्हीडीओ बघून चाहते खूप खुश झालेले दिसून येत आहेत. तसेच या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख स्टेजवर उभा असलेला दिसून येत आहे. गर्दीतून त्याला एका चाहतीचा आय लव्ह यू म्हणून आवाज येतो. त्यावर शाहरुख उत्तर देतो की, “मी पण प्रेम करतो. यानंतर आपण लग्न करु शकतो”.
SRK in a hilarious moment with a fan: ‘Arre aise thodina bolte hai publically, Meko bhi sharam aati hai!’ And then, ‘Abhi yahi hu mai, abhi kahi nahi jaa raha!’ ❤️@iamsrk @DAMACOfficial #ShahRukhKhan #SRK #DamacProperties #KingKhan #Dubai #King pic.twitter.com/VuqEg7lP4u
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) January 28, 2025
यावेळी तिथे असलेला एक चाहता म्हणतो, “मला तुम्हाला हात लावायचा आहे”, त्यावर शाहरुख खूप मजेशीर उत्तर देतो आणि म्हणतो, “अरे, असं सार्वजनिकरित्या बोलायचं नसतं. मला पण लाज वाटते”. त्यावर कार्यक्रमामध्ये एकच हशा पिकला. सगळे जण शाहरुखच्या खेळकर स्वभावाला खूप पसंती देताना दिसले.
आणखी वाचा – मोठा निर्णय ! सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणातील आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
शाहरुखचा आता ‘किंग’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. याबद्दल शाहरुख म्हणाला की, “मी या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. अजून काही महीने या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु राहील. चित्रपटाचा दिग्दर्शक खूपच कठोर आहे. त्यांनी ‘पठाण’ चित्रपटाचेही दिग्दर्शन केले आहे. त्याबद्दल मी जास्त बोलू शकत नाही. पण हा चित्रपट तुमचे खूप मनोरंजन करेल अशी खात्री देतो”. या चित्रपटामध्ये शाहरुखची मुलगी सुहाना खानदेखील दिसणार आहे.