बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या तो त्याच्या कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. अभिनेता गुरुवारी त्याचा मुलगा अबराम खानच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला हजर राहिला होता. अबराम ख्रिसमस थीम असणाऱ्या एका नाटकामध्ये स्नोमॅनची भूमिका साकारत होता. त्याला परफॉर्म करताना बघून शाहरुख चांगलाच भावूक झालेला दिसून आला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना बघायला मिळत आहे. त्यामुळे आता या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या अधिक प्रतिक्रिया असलेल्यादेखील दिसून आल्या. नक्की काय झालं? हे आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया. (shahrukh khan emotional video)
सोशल मीडियावर शाहरुख खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. शाहरुखबरोबर पत्नी गौरी खान व मुलगी सुहाना खानदेखील दिसून आली. जेव्हा अबराम परफॉर्म करत होता तेव्हा शाहरुख त्याला प्रोत्साहन देताना दिसला. तसेच त्याने मुलाबरोबर गाणं गाताना दिसला. हा व्हीडीओ आता सोशल मीडियावर अधिक व्हायरल होताना दिसत आहे.
Yeh Jo Desh Hai Tera’ hits differently when Shah Rukh Khan himself sings it. 🥹✨@iamsrk @gaurikhan #SuhanaKhan #ShahRukhKhan #GauriKhan #DhirubhaiAmbani #AnnualDay #KingKhan #SRK #King #AbRam #Swades pic.twitter.com/GR33N4FYhw
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) December 19, 2024
सोशल मीडियावर शाहरुखचे अनेक फोटोदेखील व्हायरल होताना दिसत आहेत. जेव्हा मुलं परफॉर्म करायला सुरुवात करतात तेव्हा शाहरुखदेखील टाळ्या वाजवताना दिसत आहे तसेच चीयर करतानाही दिसत आहे. त्याचप्रमाणे ‘स्वदेस’ या चित्रपटातील ‘ये जो देस है तेरा’ हे गाणं गातानाही दिसत आहे.
अबरामला मंचावर बघून शाहरुखचे चाहते खूप खुश झाले आहेत. ११ वर्षीय अबरामने वडील व मोठ्या भावाबरोबर डिज्नि लाईव्ह ‘मुफासा : द लायन किंग’ मध्ये आवाज दिला आहे. २० डिसेंबर रोजी हा चित्रपट सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. बॉक्स ऑफीच्या रिपोर्टनुसार, २०१९ साली आलेल्या ‘द लायन किंग’ चा रिमेक आहे. हा चित्रपट १० कोटी रुपयांची कमाई करण्याची आशा आहे. शाहरुखचे ‘डंकी’, ‘जवान’, ‘पठाण’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.