बॉलिवूड सुपरहिट चित्रपट ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातील अभिनेत्री सोनाली सेहगल चांगलीच चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वी ती आई झाली असून एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोनाली सोशल मीडियावर अधिक सक्रिय असते. तिच्या आयुष्यातील अनेक अपडेट ती देताना दिसते. गरोदर असल्याची माहितीदेखील सोनालीने सोशल मीडियाच्या माध्यामातून दिली होती. तिने एक गोड पोस्ट शेअर करत तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. मात्र मुलीच्या जन्मानंतर ती पूर्णपणे व्यस्त झाली. तिला अनेक समस्यांचा सामनादेखील करावा लागला. आशातच आता तिने तिच्या आयुष्याबद्दल एका मुलाखतीमध्ये भाष्य केले आहे. (Sonnalli Seygall Postpartum Depression)
ती एका मुलाखतीमध्ये म्हणाली की, “मुलगी झोपलेली असेल किंवा शांत असेल तरीही मला खूप त्रास होतो. मुलीला दर दोन तासाला मला दूध पाजावं लागतं. पण हे सगळं करण्यासाठी माझ्यामध्ये ताकद कुठून येते हे समजत नाही. मला वाटतं की गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यात या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही तयार होत असता. कारण आठव्या व नवव्या महिन्यात तुम्हाला सारखं बाथरुममध्ये जावं लागतं”.
पुढे ती म्हणाली की, “या सगळ्यामुळे तुम्हाला रात्री सारखं उठावं लागतं. मी रात्री केवळ दोन-तीन तासच झोपू शकते आणि नंतर लगेचच सकाळ होते. मी मदतीला कोणीही ठेवले नाही. मी बाळाला सोडून आराम करु शकत नाही. मी सध्या पोस्टपार्टम डिप्रेशनमधून जात आहे. पण हे सगळं मी मॅनेज करायलादेखील शिकलो आहे. मी स्वतःसाठी मिळेल तितका वेळ काढते”.
आशिष व सोनालीचे गेल्या वर्षी ७ जून २०२३ रोजी गुरुद्वारामध्ये लग्न झाले होते. या लग्नाला कुटुंबातील सदस्य आणि खास मित्रांनीच हजेरी लावली होती. सोनाली व आशिष लग्नाआधी पाच वर्षे एकमेकांना डेट करत होते. ‘प्यार का पंचनामा’ सहकलाकार कार्तिक आर्यन आणि सनी सिंग यांनीही सोनालीच्या लग्नाला हजेरी लावली होती. तसेच २७ नोव्हेंबरच्या संध्याकाळी एका मुलीला जन्म दिला.