‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत भुवनेश्वरीच चारुलता आहे हे सत्य अक्षराने सर्वांसमोर आणलेलं आहे, मात्र यामागे तिचा नेमका हेतू काय आहे? हे सिद्ध कऱण्यात अक्षरा यश आलं नाही. अक्षरा अधिपतीला वेळोवेळी सत्य सांगण्याचा, सावध करण्याचा प्रयत्न करते मात्र आईवरील प्रेमाची डोळ्यावर पट्टी बांधून घेतल्याने तो बायकोवर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे अधिपती एकीकडे अक्षराचा रागराग करु लागतो. तर भुवनेश्वरीही मुद्दाम अक्षराला अधिपतीसमोर अडकवताना दिसते. अशातच अक्षराने घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. (Tula Shikvin Changlach Dhada serial update)
अशातच आता या मालिकेच्या एका नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे आणि या नवीन अध्यायाचा एक प्रोमोही नुकताच शेअर करण्यात आला आहे. या नवीन प्रोमोमधून तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार असल्याचे पाहायला मिळत आहे. हा नवीन ट्विस्ट म्हणजे अक्षराच्या गरोदरपणाचा. या नवीन प्रोमोमध्ये अक्षराय एका तलावाशेजारी उभी असल्याचे पाहायला मिळत आहे. तेव्हा तिथे भुवनेश्वरी येते आणि तिला जीव द्यायचा विचार आहे का? आणि असं टकामका का बघत आहात? द्या जीव” असं म्हणते.
यावर अक्षरा सासूला उत्तर देत असं म्हणते की, “पाणी आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देतं. खरं तर तुम्हीही पाण्यात स्वत:ला बघितलं पाहिजे. पण ही तुम्हाला नाही कळणार. कारण हे सगळं समजून घेण्यासाठी शिक्षणाची गरज असते.” अक्षराचे ही उत्तर ऐकताच भुवनेश्वरी तिच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत असताना दुर्गेश्वरी तिथे येते आणि अधिपतीचं मूल तिच्या पोटात वाढत असल्याचे सांगते. ही ऐकताच भुवनेश्वरीलाही धक्काच बसतो.
आणखी वाचा – श्वेता शिंदेंनी किरण-वैष्णवी यांना लग्नाच्या दिल्या खास शुभेच्छा, म्हणाल्या, “‘देवमाणूस’ मालिकेच्या सेटवर…”
पुढे अक्षरा पाण्यात दिवा सोडते आणि “अधिपती व माझ्या बाळाला सुख आणि शांती लाभो” असं म्हणते. यानंतर भुवनेश्वरी मनातल्या मनात “आता तुमची मनातल्या मनात कायमची शांती करावी लागेल” असं म्हणते. त्यामुळे आता पुढे मालिका कोणत्या वळणावर जाणार? मूल होणार असल्याचे कळताच अधिपती पुन्हा अक्षराला घरी घेऊन जाणार का? आणि या खुशखबरमुळे अधिपती—अक्षरा यांच्या नात्याला काय वेगळं नवीन वळण येणार? ही पाहणेदेखील उत्सुकतेचे ठरणार आहे.