बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यदेखील अधिक चर्चेत राहिले आहे. स्क्रीनवर रोमॅंटिक दिसणारा शाहरुख हा खासगी आयुष्यातही तितकाच रोमॅंटिक असलेला बोलले गेले आहे. दिल्लीवरुन करिअर करण्यासाठी तो मुंबईमध्ये आला. यादरम्यान त्याची ओळख गौरीबरोबर झाली. १९८८ साली दोघांचीही एका पार्टीदरम्यान ओळख झाली होती. जेव्हा तो गौरीला पहिल्यांदा भेटला तेव्हाच तो तिच्या प्रेमात पडला होता. त्यावेळी शाहरुखचे करिअर सुरु झाले नव्हते. मात्र अनेक अडचणींचा सामना करुन त्याने गौरीशी विवाह केला. (shahrukh khan married life)
गौरी व शाहरुख यांच्या नात्याचे अनेक किस्से आजवर ऐकायला मिळाले आहेत. त्यातील एक किस्सा म्हणजे एका अभिनेत्रीमुळे या दोघांचीही पहिली रात्र खराब झाली होती. २५ ऑक्टोबर १९९१ रोजी दोघं लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाची मोठ्या प्रमाणात चर्चादेखील झाली होती. लग्नानंतर त्याच्या आयुष्यात अनेक समस्यादेखील आल्या. मात्र याचा परिणाम त्याने नात्यावर होऊ दिला नाही. पण त्यांच्या लग्नाच्या पहिल्या रात्री नक्की काय झालं? हे आता जाणून घेऊया.
लग्नाच्या रात्री त्रास देणारी अभिनेत्री म्हणजे हेमा मालिनी. त्यावेळी शाहरुख हेमा यांच्या ‘दिल आशना’ या चित्रपटामध्ये काम करत होता. या चित्रपटाच्या वेळी शाहरुखचा या क्षेत्रात संघर्ष सुरु होता त्यामुळे त्याच्यासाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा होता. त्यावेळी तो भाड्याच्या घरात राहत असे. लग्नाच्या वेळी शाहरुखच्या मित्रांनी त्याच्यासाठी हॉटेलमध्ये रुम बुक केली होई. तसेच त्याने हेमा यांना तो मुंबईमध्ये आल्याचेही सांगितले. त्याचक्षणी हेमा यांनी त्वरित त्याला शूटसाठी सेटवर बोलावले. नवीन नवरीसह तो सेटवर पोहोचला मात्र तिथे हेमा हजर नव्हत्या. हे शूट रात्री दोन वाजेपर्यंत चालले तरीही हेमा तिथे आल्या नव्हत्या.
शूट संपवून जेव्हा तो गौरीकडे आला तेव्हा ती तिथेच खुर्चीत बसून होती. तिला असं पाहून शाहरुखला खूप दु:ख झाले होते. त्याने हा प्रसंग स्वतः माध्यमांशी बोलताना सांगितला होता. तो म्हणाला की, “मला माझ्या निर्णयाचा पश्चाताप झाला आणि रडायलादेखील आले होते. आमच्या पहिल्या रात्रीला गौरी एकटी होती. एकमेकांबरोबर काहीही न बोलता आम्ही हॉटेलवर आलो. ती रात्र माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती”. दोघांचे प्रेम हे नेहमी दिसून येत असते. तो नेहमी गौरीबद्दल कौतुकाचे शब्द बोलताना दिसतो.