Bigg Boss Marathi Update : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाने साऱ्यांना वेड लावलं आहे. सुप्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख यंदाच्या या पर्वाचे सूत्रसंचालन करत आहे. अगदी रंगतदार खेळ सुरु असताना ‘भाऊचा धक्का’मध्ये रितेश देशमुखने चुकी असलेल्या सर्व स्पर्धकांची चांगलीच कानउघडणी केलेली पाहायला मिळाली. या पर्वात नुकत्याच झालेल्या एलिमनेशन राउंडमध्ये या पर्वात पहिल्याच आठवड्यात नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांमध्ये अंकिता वालावलकर, धनंजय पवार, सुरज चव्हाण, वर्षा उसगावकर, पुरुषोत्तम दादा पाटील आणि योगिता चव्हाण हे स्पर्धक होते. प्रेक्षकांनी दिलेल्या वोटिंगनुसार यंदाच्या पर्वातील घराबाहेर पडणारा पहिला स्पर्धक म्हणजेच पुरुषोत्तम दादा पाटील आहे.
या पर्वातील पुरुषोत्तमदादा पाटील यांचा प्रवास संपला असून त्यांना घराबाहेर पडावे लागले आहे. घराबाहेर पडताना पुरुषोत्तम दादा पाटील यांना निरोप देताना सर्व स्पर्धक भावुक झाले. पेशाने कीर्तनकार असलेल्या पुरुषोत्तम दादा पाटील या स्पर्धकाने घराबाहेर पडतानाही संतांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला आणि जाता जाता त्यानं पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली. हा जय जयकार सर्व स्पर्धक करताना दिसले मात्र यावेळी अरबाज पटेल हा जयजयकार ऐकून अगदी स्तब्ध उभा होता. त्याच्या तोंडून एकही अक्षर फुटलं नाही हे पाहून प्रेक्षकांनी त्याला चांगलंच ट्रोल केलेलं पाहायला मिळालं.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : अनेक अडथळ्यातून पारू व अहिल्यादेवींचं व्रत पुर्ण, आतातरी आदित्यचा जीव वाचणार का?
‘कलर्स मराठी वाहिनी’च्या पेजवरुन पुरुषोत्तम दादा पाटील यांना निरोप देण्यात आला. या पोस्टखाली अनेकांनी कमेंट करत अरबाजच्या वागणुकीवर आक्षेप घेतला. नेटकऱ्यांनी यावर कमेंट करत अरबाजला ट्रोल केलेलं पाहायला मिळालं. “परत जाताना माऊली जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलले तेव्हा हा अरबाज गप्प उभा होता, तरी हा Big Boss मराठी मध्ये कसा?”, “जेव्हा माऊली संतांचा जयजयकार करत होते तेव्हा अरबाज पटेलच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडला नाही”, “गेल्या चार सीझनमध्ये कोणीही हे करु शकले नाही. आज पुरुषोत्तम दादांनी करुन दाखवलं. माझ्या स्वराज्याच्या राजाचं आणी धाकल्या धन्याच, संतांचं नाव बिग बॉसच्या घरात दुमदुमलं. खरंच खूप आभार महाराज. इथे सुद्धा धर्माचा तिरस्कार पाहायला मिळाला पण ज्या व्यक्तीने केला त्यालाही लवकरच बाहेर काढू”, असं म्हटलं आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : आधी प्रेमाचं नाटक, आता निक्की तांबोळी व अरबाजमध्ये फाटाफूट, तिच्यावर आवाज चढवून बोलताच…
तर आणखी काही नेटकऱ्यांनी, “अरे या अरबला कशाला घेतलं. ज्याच्या तोंडातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जय येऊ शकत नाही ते महाराष्ट्र काय देशात राहायच्या लायकीचे नाही. त्याच्या तोंडावर बघितलं तर महाराजांचे नावे घेतल्यावर बारा वाजले होते. तो जय नाही म्हणाला तरी काही फरक पडत नाही. महाराजांची उंची खूप मोठी आहे”, अशा कठोर शब्दात त्याला चांगलंच ट्रोल केलं आहे.