शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

६५ व्या वर्षी संजय दत्तने चौथ्यांदा केलं लग्न, मान्यता दत्तच्या सध्या लूकची चर्चा, फोटो व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 10, 2024 | 2:49 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sanjay Dutt Married  photo

संजय दत्तच्या चौथ्या लग्नाची होतेय चर्चा?, व्हिडीओ व्हायरल

Sanjay Dutt Married  photo : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने पुन्हा एकदा सात फेरे घेतले असल्याचं समोर आलं आहे. वयाच्या ६५ व्या वर्षी हा अभिनेता पुन्हा एकदा बोहोल्यावर चढला आहे. वास्तविक, संजय दत्तचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून असे दिसते आहे की, अभिनेत्याने चौथ्यांदा लग्न केले आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्या पत्नीचा चेहराही समोर आला आहे. हे व्हायरल फोटो पाहून त्याने कोणाशी लग्न केले? याची चर्चा सुरु झाली. तर संजय दत्तने दुसऱ्या कोणाशी नाही तर त्याची तिसरी पत्नी मान्यता दत्तबरोबर दुसऱ्यांदा लग्न केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, अभिनेता मान्यताचा हात धरुन तिच्याबरोबर सातफेरे घेताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये संजय दत्त भगव्या रंगाचा धोती-कुर्ता परिधान केलेला दिसत आहे. मान्यता दत्त साध्या ऑफ व्हाइट सूटमध्ये दिसत आहे. या व्हिडीओशिवाय, मान्यताने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ती आणि संजय हवनकुंडासमोर बसलेले दिसत आहेत. यावेळी संजय दत्तने पिवळ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केलेला दिसला. तर प्रिंटेड सूट घातलेली मान्यता हात जोडून प्रार्थना करताना दिसली.

आणखी वाचा – Video : कोल्हापूरकरांनी जिंकलं! डीपीला भेटण्यासाठी रस्त्यावर हजारोंची गर्दी, क्षणोक्षणी वडिलांची होती साथ, भावुक व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Abhi..❤ (@abhiyadav145)

या फोटोबरोबर मान्यताने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘जय माता दी’. हे फोटो पाहून त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले असले तरी स्वतः संजय दत्त किंवा मान्यता यांनी त्यांच्या पुनर्विवाहाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. संजय दत्तच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्याचीही खूप चर्चा झाली आहे.

आणखी वाचा – चाहत्यांच्या गर्दीत सूरज चव्हाणची तब्येत बिघडली, ‘तो’ व्हिडीओ पाहून अंकिता वालावलकर म्हणाली, “त्याला सांभाळायची गरज आणि…”

चार दशकांच्या आपल्या कारकिर्दीत संजय दत्तने १३५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ६५ वर्षीय संजय दत्तने तीन लग्न केले आहेत. त्याने १९८७ मध्ये रिचा शर्माशी पहिले लग्न केले. पण १९९६ मध्ये ब्रेन ट्युमरमुळे ऋचाचा मृत्यू झाला. यानंतर त्यांनी अभिनेत्री रिया पिल्लईशी लग्न केले, पण हे लग्न फार काळ टिकले नाही. यानंतर संजय दत्तने मान्यताबरोबर तिसरे लग्न केले. या लग्नापासून दोघांना २ मुले आहेत.

Tags: sanjay dutt and manyata duttSanjay Dutt Married  photosanjay dutt wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Next Post
Riteish Deshmukh Mom Birthday

Video : देशमुखांच्या मुलांचे संस्कार! रितेश देशमुखच्या भावांनी केलं आईचं औक्षण, व्हिडीओचं होत आहे कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.