बॉलिवूड अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून वारंवार धमक्या दिल्या जात आहेत. बाबा सिद्दिकींची हत्या केल्यानंतर सलमानला पुन्हा बिश्नोईकडून धमकी देण्यात आली आहे. काळवीटची शिकार केल्याप्रकरणी सलमानला या धमक्या मिळत आहे. बिष्णोई समाजात काळवीट पवित्र मानले जाते. अशातच आता, एका मुलाखतीदरम्यान, लॉरेन्सच्या चुलत भावाने दावा केला आहे की अभिनेत्याने वर्षांपूर्वी ‘कोरे चेक’ देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. लॉरेन्स बिश्नाईच्या भावाने सलमानबाबत हा धक्कादायक खुलासा केला आहे. मात्र सलमान खानने हा दावा नाकारला आहे. (Salman Khan Offered Money)
एनडीटीव्हीला दिलेल्या ताज्या मुलाखतीत, तुरुंगात असलेल्या लॉरेन्सचा चुलत भाऊ रमेश बिश्नोईने सलमान खानबरोबरच्या गँगस्टरच्या भांडणाबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. याबद्दल रमेशने दावा केला की, “जेव्हा काळवीटाचा मुद्दा पुढे आला आणि बिश्नोईंनी सलमानची निंदा केली. तेव्हा अभिनेत्याने त्यांना नुकसानभरपाई म्हणून पैसे देऊ केले होते”. तो म्हणाला की, सलमान कोरे चेकबुक घेऊन समाजाच्या नेत्यांना भेटायला आला होता आणि केस बंद करण्याच्या बदल्यात त्यांना हवी ती किंमत देण्यास सांगितले होते.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi फेम सूरज चव्हाणची कामाला सुरुवात, शूटलाही गेला, फिल्मसिटीबाहेरील फोटो समोर
सलमानचे वडील सलीम खान यांनी आरोप केला होता की, लॉरेन्स बिश्नोई पैशासाठी सलमानला टार्गेट करत आहेत. अभिनेत्याच्या वडिलांच्या या आरोपावर रमेश बिश्नोई म्हणाला की, “हा मुद्दा पैशावर नसून विचारधारेवर आधारित आहे. त्यावेळी आमचे रक्त उसळले होते. लॉरेन्सची भारतात ११० एकर जमीन होती आणि तो इतका श्रीमंत होता की त्याला कोणत्याही प्रकारची खंडणी घेण्याची गरज नव्हती. जर आम्हाला पैसे हवे होते, तर आम्ही तेव्हाच घेतले असते”. सलमानने काळवीटची शिकार केल्याने बिश्नोई समाजाचं रक्त उसळलं होतं, असंही रमेश बिश्नोईने सांगितलं.
आणखी वाचा – Tharal Tar Mag : मधुभाऊंच्या सुटकेसाठी अर्जुनचे प्रयत्न, सायली सोडून जाणार याचीही भीती, पुढे काय घडणार?
यापुढे तो असं म्हणाला की, “जेव्हा सलमानने काळवीटची हत्या केली तेव्हा आमचं रक्त सळसळत होतं. पण, आम्ही याचा न्यायनिवाडा कोर्टवर सोडला आहे. जर तुम्ही संपूर्ण समाजाची खिल्ली उडवत असाल तर समाजात नाराजी पसरणं स्वाभाविक आहे. म्हणूनच आज यासाठी बिश्नोई समाज लॉरेन्ससोबत आहे”. दरम्यान, काळवीटाच्या शिकारीची घटना १९९८ मध्ये जोधपूरमध्ये घडली होती. त्यादरम्यान सलमान खान ‘हम साथ साथ है’ चित्रपटासाठी तिथे गेला होता. गेल्या २५ वर्षांपासून हा खटला सुरू असून सलमान सध्या जामिनावर आहे.