मोढवे या लहानशा गावातून टिकटॉक स्टार आलेला सूरज चव्हाण आज संपूर्ण महाराष्ट्रभरात लोकप्रिय झाला आहे. ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात ग्रँड प्रीमियरला १६ व्या क्रमांकावर म्हणजेच सगळ्यात शेवटी त्याने प्रवेश केला होता. यावेळी ‘मीच घरातून शेवटी बाहेर पडेन आणि ट्रॉफी जिंकेन’ असा निर्धार त्याने केला होता. अखेर सूरजने त्याचा शब्द खरा करून दाखवला आणि त्याने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचं विजेतेपद पटकावलं. सूरजने असंख्य अडचणींवर मात करत यशाचा हा एवढा मोठा टप्पा गाठला आहे. त्याच्या आई-बाबांचं लहानपणीचं निधन झाल्याने सूरजला शिक्षण घेता आलं नाही. मोठ्या बहिणीने याचा सांभाळ केला. (Suraj Chavan Shooting Start)
‘बिग बॉस’च्या घरात पॅडी आणि अंकिता यांनी त्याला सगळे टास्क समजावून सांगितले. पंढरीनाथ आणि सूरजच्या सुंदर मैत्रीची तर सीझनभर प्रचंड चर्चा झाली. ‘टीम बी’ने सूरजला पहिल्या दिवसापासून भक्कम साथ दिली आणि या सगळ्या सदस्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे तसेच प्रेक्षकांच्या प्रेमामुळे त्याला ‘बिग बॉस मराठी ५’ची ट्रॉफी जिंकता आली. सूरज चव्हाण विजेता होताच त्याला बक्षीस म्हणून चांगली रक्कम मिळाली. एवढेच नाही तर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला घेऊन एक चित्रपट करणार असल्याची घोषणाही केली.

आणखी वाचा – Bigg Boss 18 : विवियन, मुस्कान, नायरा, अविनाश व रजत यांच्यावर नॉमिनेशनची टांगती तलवार, कोण जाणार घराबाहेर?
अशातच सूरजने त्याच्या आगामी शूटिंगला सुरुवात केली आहे, असं दिसत आहे. सूरजने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोमधून त्याने आगामी शूटिंगला सुरुवात केली असल्याचे म्हटलं आहे. या स्टोरीमध्ये त्याने “On The Way To Film City” असं म्हटलं आहे. तसंच या फोटोमध्ये त्याने गाडीसमोरील गणपती बाप्पाचा फोटोही शेअर केला आहे. दरम्यान, सूरज फिल्मसिटीला नक्की कोणत्या शूटसाठी गेला आहे. याची काही माहिती समोर आलेली नाही. पण त्याच्या आगामी शूटिंगसाठी त्याचे चाहते वाट पाहत आहेत हे नक्की…
सूरज चव्हाण विजेता ठरल्यानंतर बक्षीस म्हणून त्याला १४ लाख ६० हजार इतकी धनराशी मिळाली आणि मानाची ट्रॉफीही. तसेच दहा लाखांचे विशेष गिफ्ट आणि इलेक्ट्रिक बाईक मिळाली. खेळाडूवृत्ती, मितभाषी, कोणाशी पंगा न घेणारा, प्रामाणिक, मातीशी जोडलेला गोलीगत सूरज चव्हाण नेहमीच चर्चेत राहिला. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री घेतल्यापासूनच त्याने स्वतःचे वेगळेपण दाखवले. त्याने वाद घातले, राडे केले. पण त्यातही त्याने स्वतःची बाजू उत्तम पद्धतीने राखली.