बॉलिवूड अभिनेता सलमान खान व अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांची लव्हस्टोरी जगजाहीर आहे. त्यांच्या प्रेमकहाणीच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगताना पाहायला मिळाल्या. या दोघांनी जवळपास २०-२१ वर्षे एकमेकांना डेट केले आणि मग त्यांच्यात ब्रेकअप झाल्याच्या चर्चादेखील तुफान रंगल्या. सलमानच्या रागीट स्वभावामुळे ऐश्वर्याने स्वत:ला त्याच्यापासून दूर केलं आणि दोघांचं नातं तुटलं गेल्याचे म्हटले गेले. पण काही काळ लोटल्यानंतर दोघे आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले आणि ऐश्वर्याने अभिषेकबरोबर लग्न केले. (Salman Khan And Abhishek Bachchan)
दरम्यान, इतकी वर्षे झाल्यानंतरही सलमान व ऐश्वर्या यांचे अनेक किस्से सोशल मीडियावर येत असतात. आजही त्यांच्या नावाची तितकीच चर्चा होताना पाहायला मिळते. अशातच दोघांच्या नावाबद्दल पुन्हा एकदा चर्चा होताना दिसत आहे. काल (२१ डिसेंबर) रोजी प्रसिद्ध चित्रपट निर्माते आनंद पंडित यांचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी मंचावर अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांच्यासह सलमानही तिथे उपस्थित होता. तेव्हा सलमानने आधी अमिताभ यांना हात मिळवला आणि मग दोघांनी एकमेकांना मिठीही मारली.
अमिताभ यांच्यानंतर सलमानने अभिषेकलासुद्धा मिठी मारली. इतकंच नव्हे तर दोघेही बराच वेळ एकमेकांबरोबर गप्पा मारतानाही दिसले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओवरुन अनेक चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ अभिषेक व सलमान यांचा असला तरी या व्हिडीओखाली अनेकांनी ऐश्वऱ्याच्या नावाचा उल्लेख केला आहे.
या व्हायरल व्हिडीओच्या कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनी ऐश्वर्याचा उल्लेख केल्यामुळे सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगत आहेत. या व्हिडीओखाली एका नेटकऱ्याने “सलमान भाई, अभिषेकला ऐश्वर्या कशी आहे हे विचारत आहे, सलमान भाई ऐश्वर्याचे प्रेम विसरले आहेत वाटतं, आपल्या एक्सच्या नवऱ्याबरोबर बोलणं खूप कठीण असतं, माहीत नाही हे लोकं कसे काय करतात” अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओखाली आल्या आहेत. याचबरोबर अनेकांनी ऐश्वर्याचा उल्लेख केला आहे.