सध्या सर्वत्र एनसीपी नेते व महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची चर्चा सुरु आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या सर्व घटनेची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. यामध्ये सलमान अधिक भावुक झालेला दिसून आला. या सगळ्या प्रकारानंतर अभिनेता सलमान खानला मोठा धक्का बसला आहे. यानंतर त्याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच वांद्रे येथील त्याच्या गॅलक्सी अपार्टमेंटबाहेरील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. अशातच आता त्याच्या कुटुंबाने सुरक्षेबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (salman khan family on security)
बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर सलमानच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. संपूर्ण कुटुंब आता सलमानच्या सुरक्षेबाबत चिंतेत आहे. तसेच त्यांनी सलमानची सुरक्षा वाढवण्याचादेखील निर्णय घेतला आहे. सध्या त्याचे मित्र व जवळच्या माणसांनी त्याला भेटू नये अशी विनंतीदेखील कुटुंबाने केली आहे.
‘इंडिया टुडे’च्या रिपोर्टनुसार, सलमान त्याचे जवळचे मित्र सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर पूर्णपणे कोसळला आहे. लीलावती रुग्णालयातून आल्यापासून तो खूप शांत झाला आहे. तसेच सिद्दीकी यांचा मुलगा झीशानचीदेखील वारंवार विचारणा करत आहेत. सिद्दीकी यांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, “सलमान फोनवरुन अंतिम संस्कारची व्यवस्था व इतर सगळी माहिती घेत आहेत. तसेच त्याने आता त्याच्या पुढील दिवसातील सगळ्या मीटिंगदेखील रद्द केल्या आहेत”.
दरम्यान आता सलमानचे सगळे कुटुंबीय खूप दु:खी आहे. सलमानबरोबरच अरबाज खान, सोहेल खान हेदेखील सिद्दीकी यांच्या खूप जवळचे होते. ते त्यांच्या इफ्तार पार्टीमध्येदेखील सहभागी होताना दिसून यायचे. सिद्दीकी व सलमान यांचे घरोब्याचे संबंध होते. जेव्हा काही दिवसांपूर्वी सलमानच्या घरावर गोळीबार झाला तेव्हा सर्वात आधी सिद्दीकी त्याची विचारणा करण्यासाठी गेले होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने सलमान खूप दु:खी असल्याचेदेखील दिसून आले आहे. त्यांच्या अंतयात्रेवेळी सलमानच्या डोळ्यातील अश्रु स्पष्टपणे दिसून येत होते.