शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बाबा सिद्दीकी यांच्यानंतर सलमान खानच्याही जीवाला धोका?, कुटुंबातील मंडळीही चिंतेत, म्हणाले, “त्याची सुरक्षा वाढवा कारण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 14, 2024 | 1:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
salman khan family on security

सलमान खानच्या कुटुंबियांची मागणी

सध्या सर्वत्र एनसीपी नेते व महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची चर्चा सुरु आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या सर्व घटनेची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. यामध्ये सलमान अधिक भावुक झालेला दिसून आला.  या सगळ्या प्रकारानंतर अभिनेता सलमान खानला मोठा धक्का बसला आहे. यानंतर त्याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच वांद्रे येथील त्याच्या गॅलक्सी अपार्टमेंटबाहेरील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. अशातच आता त्याच्या कुटुंबाने सुरक्षेबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (salman khan family on security)

बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर सलमानच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. संपूर्ण कुटुंब आता सलमानच्या सुरक्षेबाबत चिंतेत आहे. तसेच त्यांनी सलमानची सुरक्षा वाढवण्याचादेखील निर्णय घेतला आहे. सध्या त्याचे मित्र व जवळच्या माणसांनी त्याला भेटू नये अशी विनंतीदेखील कुटुंबाने केली आहे.

आणखी वाचा – कुष्ठरोगी, अनाथ, वृद्धांसाठी जुई गडकरीचा मदतीचा हात, अभिनेत्रीचं कौतुकास्पद काम, व्हिडीओद्वारे म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

‘इंडिया टुडे’च्या रिपोर्टनुसार, सलमान त्याचे जवळचे मित्र सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर पूर्णपणे कोसळला आहे. लीलावती रुग्णालयातून आल्यापासून तो खूप शांत झाला आहे. तसेच सिद्दीकी यांचा मुलगा झीशानचीदेखील वारंवार विचारणा करत आहेत. सिद्दीकी यांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, “सलमान फोनवरुन अंतिम संस्कारची व्यवस्था व इतर सगळी माहिती घेत आहेत. तसेच त्याने आता त्याच्या पुढील दिवसातील सगळ्या मीटिंगदेखील रद्द केल्या आहेत”.

आणखी वाचा- Bigg Boss 18च्या घरातून गधराज बाहेर, तर गुणरत्न सदावर्तेंचा घरात तुफान डायलॉगबाजी करत राडा, या आठवड्यात कोण बाहेर पडणार?

दरम्यान आता सलमानचे सगळे कुटुंबीय खूप दु:खी आहे. सलमानबरोबरच अरबाज खान, सोहेल खान हेदेखील सिद्दीकी यांच्या खूप जवळचे होते. ते त्यांच्या इफ्तार पार्टीमध्येदेखील सहभागी होताना दिसून यायचे. सिद्दीकी व सलमान यांचे घरोब्याचे संबंध होते. जेव्हा काही दिवसांपूर्वी सलमानच्या घरावर गोळीबार झाला तेव्हा सर्वात आधी सिद्दीकी त्याची विचारणा करण्यासाठी गेले होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने सलमान खूप दु:खी असल्याचेदेखील दिसून आले आहे. त्यांच्या अंतयात्रेवेळी सलमानच्या डोळ्यातील अश्रु स्पष्टपणे दिसून येत होते.

Tags: baba siddiqui deathsalman khasecurity
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Deputy Chief Minister Ajit Pawar asking BIgg Boss Marathi 5 winner Suraj Chavan about addiction is video viral on social media

"व्यसन करतो का?", सूरज चव्हाणला अजित पवारांनी विचारला प्रश्न, म्हणाला, "तुम्ही 'बिग बॉस'मध्ये पाहिलं नाहीत का?"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.