शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ईदला सलमान खानचं चाहत्यांना मोठं सरप्राइज, आणखी एका ब्लॉकबस्टर चित्रपटाची घोषणा, म्हणाला, “पुढच्या ईदला…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 11, 2024 | 1:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
salman khan upcoming movie

ईदला सलमान खानचं चाहत्यांना मोठं सरप्राइज, आणखी एका ब्लॉकबस्टर चित्रपटाची घोषणा, म्हणाला, "पुढच्या ईदला..."

ईद व बॉलीवूड हे खूप जुनं नातं आहे. ईदच्या दिवशी बॉलीवूडमधील खान मंडळी नेहमी एक जबरदस्त चित्रपट नेहमी प्रेक्षकांच्या भेटीला आणत असतात. अधिकतर बॉलिवूड अभिनेता सलमान खान या दिवशी एक नवीन चित्रपट प्रदर्शित करणारच अशी धारणा त्याच्या चाहत्यांनी झाली आहे. अशातच त्याने आता त्याच्या चाहत्यांना ईदच्या दिवशी आनंदाची बातमी दिली आहे. त्याने आज २०२५ मध्ये नवीन चित्रपट घेऊन येणार आधी घोषणा केली आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. (salman khan upcoming movie)

२०२५ मध्ये ईदच्या दिवशी सलमानच्या चाहत्यांना जबरदस्त चित्रपटाची मेजवानी मिळणार आहे. सलमान आता सुप्रसिद्ध निर्माते साजिद नाडियाडवाला व व्हिजनरी दिग्दर्शक ए. आर. मुरुगाडोस यांच्याबरोबर मिळून एक नवीन चित्रपट बनवणार आहेत. आज ईदच्या मुहूर्तावर त्यांनी या चित्रपटाचे नाव समोर आणले आहे. २०२५ साली सलमान जो चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्याचे नाव ‘सिकंदर’ आहे. या चित्रपटातून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

आणखी वाचा – “हाय बोलल्यावर माकड पटकन चावला अन्…”, सई ताम्हणकर इंजेक्शन घेण्यासाठी जाताच डॉक्टरही हसू लागले आणि…; म्हणाली, “तीन ते चार इंजेक्शन्स…”

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

याबद्दल त्याने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्याने चित्रपटाचे पोस्टर शेअर करत आणि ईदच्या शुभेच्छा देत लिहिले आहे की, “या ईदला ‘बडे मिया छोटे मिया’ व ‘मैदान’ पहा आणि पुढच्या ईदला ‘सिकंदर’ तुमच्या भेटीला येणार आहे. सर्वांना ईदच्या शुभेच्छा. त्याच्या या पोस्टवर नेटकाऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा- Video : सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या बाथरुममध्ये चक्क साप, व्हिडीओ शेअर करत दाखवली संपूर्ण घटना, म्हणाला, “फ्लश हँडलजवळ साप पडला अन्…”

सलमानने शेअर केलेल्या पोस्टवर एका नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “तुमच्याशिवाय ईद अधुरी वाटत आहे”, दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “तुमच्या चित्रपटाची आम्ही वाट पाहत आहोत”, अजून एका नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “भाईजान इज बॅक”, यावरुन सलमानचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत असल्याचे दिसून येत आहे.

‘सिकंदर’ चित्रपटाआधी सलमानने साजिदबरोबर मिळून ‘जुडवा’, ‘किक’, ‘मुझसे शादी करोगी’ असे अनेक दमदार चित्रपट केले आहेत. हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हीट झाले होते. आता ‘सिकंदर’ काय कमाल दाखवतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.   

Tags: bollywood actorpostsalman khanupcoming movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Next Post
Tharal Tar Mag New Promo

शॉर्ट वनपीस, हिल्स सँडल अन्…; अर्जुनला इम्प्रेस करायला सायलीने लढवली युक्ती, प्रेमाची कबुली देणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.