अभिनेता सलमान खान सध्या खूप चर्चेत आहे. एनसीपी नेते व सलमानचे जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बॉलिवूडमधील सगळ्याच कलाकारांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या. अशातच आता काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील एका इसमाने सलमान व बाबा सिद्दीकींचा मुलगा झिशान सिद्दीकीला फोन करुन जीवे मारण्याच्या धमकीबरोबरच पैशांचीदेखील मागणी करण्यात आली. त्यामुळे आता सलमानच्या सर्व प्रश्नांवर ज्योतिषांनी भविष्यवाणी केली आहे. यामुळे सलमानच्या करीयरवर नक्की काय परिणाम होणार? तसेच येणारा काळ सलमानसाठी कसा असेल? याबद्दल ज्योतिषांनी भविष्यवाणी केली आहे. हे नक्की काय आहे? हे जाणून घेऊया. (salman khan kundli)
सलमान खानचा जन्म २७ डिसेंबर १९६५ रोजी दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी इंदौर येथे झाला आहे. सालमानची कुंडली मेष तसेच रास कुंभ आहे. त्याचा दशम भावातील मंगळ प्रभाव असून कुलदीप योग बनला आहे. सलमानच्या कुंडलीमध्ये लग्नाचा स्वामी मंगळ दशम भाव उच्च राशीचा असल्याने सलमानला बॉडीबिल्डिंगची खूप आवड आहे. तसेच दशम भावामध्ये शुक्र असल्याने त्याचे मनोरंजन क्षेत्रांमध्ये चांगले करियरदेखील दिसून येत आहे.
दरम्यान गेल्या काही वर्षांपासून लॉरेन्स बिश्नोइकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या. याबद्दलदेखील ज्योतिषांनी भाविष्यवाणी केली आहे. सलमाच्या कुंडलीमध्ये लग्न स्थिती आहे. लग्नाचा स्वामी व अष्टमचा स्वामी मंगळ असल्याने दहाव्या स्थानात दिर्घायु योग तयार होत आहे. तसेच शत्रू भावामुळे याचा विशेष प्रभाव पडणार नाही. त्यामुळे शरीराला कोणत्याही शत्रूकडून नुकसान होण्याच्या शक्यता कमी असणार आहेत.
दहाव्या स्थानी मंगळ प्रभावी असल्याने सलमानची सुरक्षितता चांगली राहू शकते. कोणीही सलमानला नुकसान पोहोचवू शकत नाही. लॉरेन्स कधीही त्याच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. पण सलमानचे ग्रह पाहता येत्या काळामध्ये त्याने सुरक्षित राहणे गरजेचे आहे. तसेच त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतारदेखील येऊ शकतात.