‘बिग बॉस ओटीटी ३’ मुळे प्रसिद्धी झोतात आलेले नाव म्हणजे अरमान मलिक. अरमान मलिक हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींबरोबर ‘बिग बॉस ओटीटी २’ च्या घरात आला होता. अरमान दोन्ही पत्नींबरोबर ‘बिग बॉस’च्या घरात दाखल झाल्याने त्याच्यावर जोरदार टीका ही करण्यात आली होती. अरमान मलिकने पायलबरोबर घटस्फोट न घेता कृतिकाबरोबर लग्न केले. कृतिका आणि पायल आता एकाच घरात राहतात. अरमानचे आधी एक लग्न झाले असून त्याचा घटस्फोट झाला. त्यानंतर अरमानने कृतिका व पायल यांच्याशी लग्न केले. अशातच गेल्या आठवड्यात त्याच्या चौथ्या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. (Armaan Malik Going To Be Father)
रमानची पत्नी कृतिकाला एक मुलगा तर पायलला एक मुलगी… असे दोन मुले आहेत. त्यानंतर युट्यूबर आता पाचव्यांदा वडील होणार आहे. त्याची पत्नी पायल मलिक पुन्हा गरोदर आहे. पायल मलिकने तिच्या व्लॉगमध्ये तिच्या गर्भधारणेचा खुलासा केला. ती म्हणाली की ती तीन महिन्यांनंतर ही आनंदाची बातमी सांगणार होती, पण ती आता सांगितली. वास्तविक, या व्हिडिओमध्ये ती तिच्या बेबी शॉवरची तयारी करताना दिसत आहे. पायलनंतर, तिच्या शेजारी उभी असलेल्या कृतिका मलिकनेही या बातमीला दुजोरा दिला.
त्यानंतर पायलची मुलगी तुबाला विचारते की, तुला काका हवा आहे की काकी? यावर तुबा उत्तर देत असं म्हणते की, काका हवा आहे. हे ऐकून पायल म्हणते की, “घरात आधीच तीन काका आहेत, काकी बोलू शकत नव्हती का? पण नंतर ती म्हणते की “काहीही झाले तरी निरोगी होऊदे”. त्यामुळे आता अरमानच्या पाचव्या वडील होण्याचा चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे.
आणखी वाचा – “पहिली शालिनीच मस्त होती”, ‘सुख म्हणजे…’ फेम माधवी निमकरला प्रेक्षकांच्या कमेंट, म्हणाले, “कमाल अभिनय…”
दरम्यान, २०११मध्ये अरमानने पायल मलिकशी लग्न केले आणि त्याला चिरायू (चिकू) मलिक नावाचा मुलगा झाला. २०१८मध्ये अरमानने पायलची मैत्रीण कृतिका मलिकशी लग्न केले. ‘बिग बॉस ओटीटी ३’ च्या घरात प्रवेश करण्यापूर्वी अरमान मलिक, पायल मलिक आणि कृतिका मलिक यांनी मंचावर होस्ट अनिल कपूर यांची भेट घेतली होती आणि तेव्हा त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे सांगितले होते.