बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

२४ तास घराबाहेर सुरक्षा असूनही नेमका हल्ला कसा झाला?, सैफ अली खानच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित, प्रकरण नेमकं काय?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 16, 2025 | 11:04 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Saif Ali Khan Attacked

२४ तास घराबाहेर सुरक्षा असूनही नेमका हल्ला कसा झाला?, सैफ अली खानच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित, प्रकरण नेमकं काय?

Saif Ali Khan Attacked : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात चोरट्यांनी केलेल्या हल्ल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या हल्ल्यात अभिनेता जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. आता या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत की २४ तासांच्या सुरक्षेत अभिनेत्यावर हल्ला कसा झाला?. सैफ त्याची पत्नी करीना आणि दोन मुले जेह आणि तैमूरबरोबर मुंबईच्या बांद्रा येथे राहतो. त्याच्या घराबाहेर २४ तास रक्षक तयार असतात. सैफच्या अपार्टमेंटमध्ये पॅप्सही प्रवेश करु शकत नाहीत आणि ठिकठिकाणी कॅमेरे बसवले आहेत.

अभिनेत्याच्या सदनिकेत प्रवेश करण्यासाठी प्रथम परवानगी घेतली जाते आणि परवानगी न मिळाल्यास कोणीही आत जाऊ शकत नाही. एवढे सगळे करुनही सैफ अली खानवर त्याच्याच घरात हल्ला झाला. अशा स्थितीत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. “एवढी कडक सुरक्षा असतानाही सैफवर हल्ला कसा झाला?”, हा प्रश्न साऱ्यांना सतावत आहे. सैफ अली खान २४ तास सुरक्षेत राहतो, त्यामुळे कोणती चूक झाली की चोर त्याच्या घरात घुसले असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे.

आणखी वाचा – ‘सहा जखमा, दोन खोल जखमा आणि…”, हल्ल्यानंतर सैफ अली खानच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून मोठी अपडेट, म्हणाले, “शस्त्रक्रिया…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सैफ अली खानने निवेदनात म्हटले आहे की, तो रात्री घरी असताना अचानक कोणीतरी त्याच्यावर हल्ला केला. करीना कपूर आणि मुले घरात असल्याने ते घाबरले होते. त्या हल्लेखोराने तीन वेळा हल्ला केला. दुखापतीमुळे त्याच्याकडून विजय मिळवता आला नाही. तर इतर नोकर झोपले होते. सर्व लोक आपापल्या घरी होते. नंतर ती व्यक्ती पळून गेली. रात्र झाल्यामुळे त्याला मारेकऱ्यांचा चेहराही स्पष्ट दिसत नव्हता.

आणखी वाचा – सैफ अली खानवर अज्ञातांनी घरात घुसून चाकू हल्ला नेमका कसा केला?, ‘त्या’ रात्री असं काय काय घडलं?, संपूर्ण घटनाक्रम समोर

या हल्ल्यात सैफ अली खानच्या मानेवर, डाव्या मनगटावर आणि छातीवर जखमा झाल्या आहेत. अभिनेत्याच्या पाठीच्या कण्यामध्येही चाकूचा एक छोटासा भाग अडकला आहे. पाठीच्या कण्याला दुखापत झाल्याने ऑपरेशनची गरज होती. न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन डॉ. लीना जैन, भूलतज्ज्ञ डॉ. निशा गांधी आणि डॉ. उत्तमनी यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर शस्त्रक्रिया करत आहे.

Tags: saif ali khan attackedSaif Ali Khan breaking NewsSaif Ali Khan Injured
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Bollywood Actor Saif Ali Khan Attacked At Home

Saif Ali Khan Attacked : "हे चोरीचं प्रकरण वाटत नाही", सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर चाहत्यांकडून प्रश्न उपस्थित, "संशयास्पद आहे की..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.