मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती सलमान खानच्या ‘हम आपके हैं कौन’ चित्रपटामुळे. या चित्रपटात रेणुका सहाय्यक भूमिकेत दिसल्या होत्या. त्यांच्या या भूमिकेमुळेच त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. आजही त्यांची तीच साधी-सरळ अन् मनाला भावणारी भूमिका सर्वांच्या मनात आहे. भूमिकेशिवाय त्या खऱ्या आयुष्यातही अगदी तशाच आहेत आणि नुकतंच याचा अनुभव काही नेटकऱ्यांना आला. रेणुका शहाणे मुंबई विमातळावर आपल्या दोन्ही मुलांबरोबर दिसल्या. यावेळी त्यांनी लाल रंगाची बनारसी साडी नेसली होती, ज्यात त्या खूप सुंदर दिसत होत्या. (renuka shahane spotted with sons)
अभिनेत्री रेणुका आणि त्याचे पती आशुतोष राणा हे नेहमीच एकत्र स्पॉट होत असतात. अशातच त्या आपल्या दोन्ही मुलांबरोबर मुंबई विमानतळावर एकत्र दिसल्या. रेणुका शहाणे कधीही दिसल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच दिलखुलास हास्य असतं. हेच हास्य यावेळीही पाहायला मिळालं. रेणुका शहाणेंचा सुंदर पेहराव आणि मुलांचा साधेपणा पाहून नेटकरी त्यांचं कौतुक करत आहेत. पापाराझींनी फोटोसाठी बोलवल्यानंतर आधी रेणुका शहाणे फोटोंसाठी पुढे आल्या, मात्र त्यांची दोन्ही तशीच मागे उभी होती.
जेव्हा आईने त्यांना बोलावलं तेव्हाच ते फोटोसाठी पुढे आले आणि त्यांच्या याच कृतीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. Viral Bhayani या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर एकाने “खूप पैसा असूनही यांनी आपल्या मुलांना अगदी साध्या पद्धतीने वाढवले आहे” अशी कमेंट केली आहे. तर आणखी एकाने “यांनी आपल्या मुलांचे चांगले संगोपन केलं आहे” असं म्हटलं आहे. तसंच अनेकांनी त्यांच्या मुलांचे संस्कारांचे व रेणूका यांच्या सौंदर्याचेही कौतुक केलं आहे.
आणखी वाचा – तितीक्षा तावडेचं लग्नानंतरचं पहिलं हळदी-कुंकू, काळ्या रंगाच्या साडीमध्ये खुललं सौंदर्य, फोटो समोर
दरम्यान, रेणुका शहाणे अभिनेत्री असण्याबरोबरच दिग्दर्शिकाही आहेत. रेणुका आणि त्याचे पती आशुतोष राणा यांच्या मुलांबद्दल फार लोकांना माहित नाही. तसेच त्यांना कुठे फार स्पॉटही केलेलं कधी दिसलं नाही. पण कदाचित पहिल्यांदाच रेणुका शहाणे या आपल्या दोन्ही मुलांबरोबर स्पॉट झाल्या आहेत. शौर्यमान आणि सत्येंद्र राणा अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत.