प्रसिद्ध कवी कुमार विश्वास हे त्यांच्या भाष्यामुळे अनेकदा चर्चेत असलेले बघायला मिळतात. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांच्या नात्यावर वादग्रस्त प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे ते खूप चर्चेत आले होते होते. अशातच आता कुमार विश्वास यांनी करीना कपूर व सैफ अली खानवर निशाणा साधला आहे. त्यांचा आता एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामदये त्यांनी करीना व सैफ यांचा मोठा मुलगा तैमुर या नावावर भाष्य केले आहे. यामुळे आता मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली आहे. (kumar vishwas on saif ali khan and kareena kapoor)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कुमार विश्वास हे बोलताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “आता कुमार विश्वास यांची ही प्रतिक्रिया सैफ अली खान व करीना कपूरसाठी आहे का?”, दरम्यान या व्हिडीओमध्ये कुमार विश्वास म्हणत आहेत की, “मला माहीत आहे की लोक इथे रेकॉर्ड करायला बसले आहेत. पण या माया नगरीमध्ये असणाऱ्यांना सगळं समजलं पाहिजे”.
क्या कुमार विश्वास की ये टिप्पणी अब सैफ अली खान और करीना कपूर के लिए है?#KumarVishwas pic.twitter.com/TaMi2dybY7
— Avdhesh Kumar (@ImAvdheshkumar) January 1, 2025
कुमार विश्वास पुढे म्हणतात की, “आता हे नाही चालणार की आमच्यामुळे लोकप्रियता आमच्यामुळे, पैसा आम्ही देणार, तिकीट आम्ही खरेदी करणार, स्टार आम्ही बनवणार आणि तुम्ही तिसऱ्या मुलाचे नाव बाहेरून आलेल्या एका आक्रमक मुघलाच्या नावावरुन ठेवणार हे चालणार नाही. इतकी नावं आहेत त्यातील कोणतंही नाव ठेऊ शकत होते. रिजवान, उस्मान, युनुस, हुजूर यापैकी काहीही नाव ठेवलं असतं. पण तुम्हाला एकच नाव मिळालं?”.
पुढे ते म्हणाले की, “ज्या नालायक लंगड्या माणसाने भारतात येऊन इथल्या आई-बहीणींवर बलात्कार केला. इतका नालायक माणूसच मिळालं होतं का गोड मुलाचं नाव ठेवायला? हा नवीन भारत आहे”. दरम्यान या वक्तव्यावर आता करीना काय प्रतिक्रिया देणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.