Shashank Ketkar Apologized Post : अभिनेता शशांक केतकर सध्या एका विशेष कारणामुळे चर्चेत आला आहे. शशांकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर केलेल्या पोस्टमुळे तो चर्चेत आलेला पाहायला मिळाला. अभिनेत्याबरोबर झालेल्या फसवणुकीविरोधात त्याने आवाज उठवत एक स्टोरी पोस्ट केली होती. त्यामुळे साऱ्यांचं लक्ष शशांकच्या या पोस्टकडे लागून राहिले होते. शशांक केतकर अनेकदा स्पष्टपणे अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. बरेचदा हा अभिनेता सामाजिक मुद्द्यांवर रील व्हिडीओ पोस्ट करताना दिसतो. शशांक केतकर हा मालिका विश्वातला लोकप्रिय चेहरा आहे. त्यामुळे अभिनेत्याच्या पोस्टकडे अनेकांच्या नजरा लागून राहिलेल्या असतात.
अशातच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बहुचर्चित ‘गुनाह सीझन २’ मध्ये शशांकची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मात्र या वेबसीरिजमध्ये काम करुनही शशांकला मानधन मिळाले नसल्याची तक्रार करत त्याने थेट आवाज उठवला. अभिनेता शशांक केतकरचीही गुनाह सीझन २च्या ‘बोधी ट्री मल्टीमीडिया’ हाऊसकडून फसवणूक झाली असल्याचं समोर आलं आहे.

“‘Gunaah season २’ आज पासून सुरु पण सीझन २ चं चित्रीकरण संपल होतं तरी सीझन २ चे पैसे परवा पर्यंत मिळाले नव्हते आणि सीझन १ चे पैसे मिळाल्या शिवाय सीझन 2 चं मी डबिंग करणार नाही अशी अट घातल्यामुळे अनेक सीनमध्ये माझ्या आवाजाऐवजी एका डबिंग आर्टिस्टकडून वाक्य डब करुन घेतली आहेत. लवकरच सविस्तर बोलेनच”, असं म्हणत त्याने सदर मीडिया हाऊसला टॅग करत आपलं मत मांडलं होतं.
ही पोस्ट केल्याच्या अवघ्या काही तासांतच शशांकने आणखी एक पोस्ट शेअर करत ही समस्या दूर झाली असल्याचं म्हटलं. शिवाय सोशल मीडियावर थेट पोस्ट शेअर केल्याने त्याने याबाबत माफीनामाही मागितलेला पाहायला मिळाला. “गैरसमज दूर झाला! धन्यवाद @bodhitreemultimedia माझी चिंता समजून घेतल्याबद्दल आणि त्वरित कारवाई केल्याबद्दल. तसेच, सोशल मीडियावर टाकल्याबद्दल मला माफी मागायची आहे”, असं म्हणत त्याने आणखी पोस्ट शेअर करत या विषयाला पूर्णविराम दिला आहे.