सध्या सर्वत्रच लग्नसराई सुरू आहे. मराठीसह हिंदीतील अनेक कलाकार लग्नगाठ बांधत आहेत. अशातच बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रणदीप हुड्डा हा देखील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्याने ‘सरबजीत’, ‘लव्ह आज कल’, ‘लाल रंग’, ‘हायवे’ यांसारख्या अनेक दर्जेदार चित्रपटांतून अभिनय करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. दरम्यान अनेक वर्षांच्या रिलेशननंतर तो मैत्रिण लीन लैश्रामबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. गेले काही दिवस त्यांच्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगत होत्या. अशातच त्याच्या लग्नाबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. (Actor Randeep Hudda And Lin Laishram Marriage)
रणदीप-लीन यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या लग्नाची घोषणा केली होती. अशातच त्यांनी सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट करत त्यांच्या लग्नाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “अर्जुनाने मणिपुरी योद्धा राजकुमारी चित्रांगदा हिच्याशी विवाह केलेल्या महाभारतातील एक पान काढून आम्हीदेखील आमच्या कुटुंबीयांच्या आशीर्वादाने व मित्रांच्या साथीने लग्न करत आहोत. आम्हाला सांगताना अतिशय आनंद होत आहे की आमचा विवाह २९ नोव्हेंबर २०२३ रोजी इंफाळ, मणिपूर येथे होणार आहे. त्यानंतर मुंबईत रिसेप्शन होणार आहे. त्याचबरोबर आम्ही आमच्या या नवीन प्रवासाला सुरुवात करत असून आम्ही तुमच्या प्रेम व आशीर्वादासाठी सदैव ऋणी आहोत.”
आणखी वाचा – नाकात नथ, नऊवारी साडी अन्…; ‘बाईपण भारी देवा’च्या अभिनेत्रींचा थायलँडमध्ये मराठमोळा लूक, फोटोने वेधलं लक्ष
दरम्यान रणदीप-लीन यांचा हा विवाहसोहळा मणीपुरच्या पारंपरिक चालीरितीनुसार होणार असून या लग्नाला त्यांचे जवळचे नातेवाईक व मित्रपरिवार असणार आहेत. रणदीप बऱ्याच दिवसांपासून त्याच्या प्रियसीबरोबर रिलेशनमध्ये आहे. त्यानंतर त्यांच्या लग्नाविषयीच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. तेव्हापासून हे दोघे नक्की कधी लग्न करणार? याविषयी चाहत्यांना प्रश्न पडला होता.
मात्र आता दोघांनी त्यांच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. त्यामुळे चाहत्यांना सुखद बसला आहे. दरम्यान या पोस्टखाली दोघांच्या चाहत्यांनी तसेच अनेक कलाकारांनी कमेंट्सद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर अनेकजण त्यांचं कौतुकदेखील करत आहेत.