बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चालू लागली रणबीर कपूर व आलिया भट्टची लेक राहा, घरातील गार्डनमध्ये धमाल-मस्ती, खेळ अन्…; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 2, 2024 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ranbir kapoor and Alia Bhatt daughter

चालू लागली रणबीर कपूर व आलिया भट्टची लेक राहा, घरातील गार्डनमध्ये धमाल-मस्ती, खेळ अन्...; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूडमधील सतत चर्चेत असलेली जोडी म्हणजे अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री आलिया भट्ट. एकमेकांना काही काळ डेट केल्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाच्या वृत्ताने सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यानंतर २०२२मध्ये आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मुलीचे नाव ‘राहा’ असे ठेवण्यात आले. तिच्या जन्मानंतर एका वर्षानेच रणबीर व आलियाने आपल्या मुलीला माध्यामांसमोर आणले. त्यानंतर राहाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अनेकांनी ती तिच्या आजोबांसारखी म्हणजे दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्यासारखी दिसत असल्याच्याही चर्चा झाल्या. राहाच्या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. (Ranbir kapoor and Alia Bhatt daughter)

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये रणबीर, आलिया व दिग्दर्शक आयन मुखर्जी दिसत असून बंगल्याच्या आवारात राहा चालताना दिसत आहे. चालताना ती मस्तीही करत आहे. हे बघून आई-वडील दोघेही कौतुकाने आपल्या मुलीकडे बघत आहेत.

आणखी वाचा – Video : रिहानाला अंबानी कुटुंबियांकडून देण्यात आले कोट्यवधी रुपये, घरी परतताना विमानतळावर तिने केलं असं काही की…; घटना कॅमेऱ्यात कैद

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt ???? (@aliaabhatt)

रणबीर व आलियाच्या मुलीचा म्हणजे राहाचा जन्म ६ नोव्हेंबर २०२२ रोजी झाला. आता ती अडीच वर्षांची झाली आहे. त्यामुळे तिने आता चालण्यासही सुरवात केली आहे. राहाचा चालतानाचा फोटो आजूबाजूच्या परिसरातून लीक झाल्याचे सांगितले जात आहे.

आणखी वाचा – “माझ्या आईला जाऊन…”, मिलिंद गवळी आईच्या आठवणीत भावुक, म्हणाले, “शरीराने ती आमच्यात नाही पण…”

या व्हायरल फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी लिहितो की, “ही राहा असू शकत नाही. ती अजून खूप लहान आहे. हा एकतर तैमुर आहे किंवा जेह”, त्यावर दुसऱ्या एकाने उत्तर दिले की, “ही राहाचं आहे”. नुकतीच राहा रणबीरबरोबर जेहच्या वाढदिवसाला दिसून आली होती. तेव्हा तिला रणबीरने उचलून घेतले होते. तेव्हा तिचे काही फोटो व्हायरल झाले होते यामध्ये तिचे हावभाव बघून तिची तुलना लहानपणीच्या आलियाशी केली होती”.

२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या रणबीरच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील रणबीरच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक करण्यात आले होते. आता लवकरच या चित्रपटाचा दूसरा भाग ‘ॲनिमल पार्क’ येणार असल्याची घोषणा ‘ॲनिमल’ च्या निर्मात्यांनी केली आहे.

Tags: alia bhattKapoor houseKapoorsraha kapoorraha photoranbir kapoorviral photo
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding in Jamnagar

Video : अंबानी कुटुंबियांच्या पार्टीत अजय-अतुलच्या 'झिंगाट' गाण्यावर थिरकले सेलिब्रिटी, रिहानाने जान्हवी कपूरबरोबर धरला ठेका, व्हिडीओ तुफान व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.