सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : अंबानी कुटुंबियांच्या पार्टीत अजय-अतुलच्या ‘झिंगाट’ गाण्यावर थिरकले सेलिब्रिटी, रिहानाने जान्हवी कपूरबरोबर धरला ठेका, व्हिडीओ तुफान व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 2, 2024 | 5:17 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding in Jamnagar

अंबानी कुटुंबियांच्या पार्टीत अजय-अतुलच्या 'झिंगाट' गाण्यावर थिरकले सेलिब्रिटी, रिहानाने जान्हवी कपूरबरोबर धरला ठेका, व्हिडीओ तुफान व्हायरल

 Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding in Jamnagar : सध्या सर्वत्रच उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट लग्नाची धामधूम सुरू आहे.  गुजरातमधील जामनगर येथे लग्नाआधीच्या कार्यक्रमांनाही शुक्रवारपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी हॉलिवूड गायिका रिहानाने हजेरी लावली होती. तिने तिच्या गाण्यांनी सर्वांचेच मनोरंज केले. तिच्या गाण्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. भारतात परफॉर्म करण्याची संधी मिळाल्यामुळे तिने अंबानी कुटुंबाचेही आभार मानले आणि अनंत व राधिकाला त्यांच्या लग्नासाठी शुभेच्छाही दिल्या.

पहिल्या दिवशीचा कार्यक्रम झाल्यानंतर रिहाना आपल्या संपूर्ण टीमसह मायदेशी परतली. ती गेल्यानंतरही तिची जादू कमी झालेली नाही. मायदेशी परत जात असताना जामनगर येथील एयरपोर्टवर तिने पोलिसांना व फोटोग्राफर्सना दिलेल्या वागणुकीमुळे तिचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. अशातच अभिनेत्री जान्हवी कपूरने रिहानाबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने सर्वांचंच लक्ष वेधून घेतले आहे.

आणखी वाचा – Video : अंबानी कुटुंबियांच्या कार्यक्रमात रिहानाचे फाटले कपडे, नीता अंबानींच्या सूनेचं नावंही नीट उच्चारता येईना, भर कार्यक्रमात झाली अशी अवस्था की…

View this post on Instagram

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ती रिहानाबरोबर चक्क मराठी गाण्यावर ठेका धरतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये, मराठीमध्ये अत्यंत गाजलेल्या ‘सैराट’ या चित्रपटातील ‘झिंगाट’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहेत. या दोघींच्या मागे अंबानींची होणारी सून राधिकाही थिरकताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत जान्हवीने कॅप्शन दिले आहे आहे की, “धीस वुमन इज अ गॉडेस्,स्टॉप इट गुडबाय”. या व्हिडीओमध्ये डान्स करताना रिहानाही मजा करताना दिसत आहे.

आणखी वाचा – Video : रिहानाला अंबानी कुटुंबियांकडून देण्यात आले कोट्यवधी रुपये, घरी परतताना विमानतळावर तिने केलं असं काही की…; घटना कॅमेऱ्यात कैद

अनंत व राधिकाच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमासाठी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यामध्ये अभिनेता अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगन, विकी कौशल, कतरिना कैफ, काजोल, सैफ अली खान, करीना कपूर खान, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर,रणबीर कपूर, आलिया भट्ट, करण जोहर आदी मंडळी उपस्थित राहिली आहेत.   

Tags: Anant Ambani Wedding News in MarathiAnant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding bashAnant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding JamnagarAnant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding Marathi NewsJamnagar AirportRihannaRihanna in Anant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Mukesh ambani cry during anant emotional speech at pre wedding event video viral

Video : लेकाचं बोलणं ऐकून भर कार्यक्रमातच रडू लागले मुकेश अंबानी, अनंतचेही डोळे पाणावले, आई स्टेजवर आली अन्…; Inside Video व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.