मराठी टेलिव्हीजन अभिनेत्री तेजश्री प्रधान नेहमी चर्चेत असलेली बघायला मिळते. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून तेजश्रीला अधिक लोकप्रियता मिळाली. नंतर ती अनेक मराठी चित्रपट व मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसून आली आहे. साध्या ती स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेमध्ये काम करताना दिसत आहे. ती यामध्ये ‘मुक्ता’ हो भूमिका साकारत असून तिच्या या भूमिकेला चाहत्यांचे खूप प्रेम मिळत आहे. मात्र सध्या तेजश्री एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलेली दिसून येत आहे. अभिनेत्रीचा नवा कोरा चित्रपट ‘हॅशटॅग तदैव लग्नम्’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याबद्दलची तो सोशल मीडिया पोस्ट आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (tejashri pradhan on marathi movie)
तेजश्री व अभिनेता सुबोध भावे यांची मुख्य भूमिका असलेला ‘हॅशटॅग तदैव लग्नम्’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. याबद्दलच्या पोस्ट अनेक कलाकार कर आहेत. मात्र तेजश्रीच्या एका पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार चित्रपट हाऊसफूल असूनही चित्रपटासाठी चित्रपटगृह उपलब्ध नसल्याची खंत तेजश्रीने व्यक्त केली आहे. याबद्दलची तिने एक खोचक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
तेजश्रीने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, “ ‘हॅशटॅग तदैव लग्नम्’ हा आमचा चित्रपट पुणे व मुंबईमध्ये (मिळालेल्या मोजक्या चित्रपटगृहांमध्ये) हाऊसफूल सुरु आहे. पण महाराष्ट्रात मराठी चित्रपटांसाठी चित्रपटगृहच उपलब्ध नाहीत हे दुर्दैवी आहे”. तेजश्रीच्या या पोस्टकडे आता सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. दरम्यान या चित्रपटांमध्ये दमदार कलाकार बघायला मिळत आहेत. तेजश्री व सुबोधबरोबरच प्रदीप वेलणकर,संजय खापरे,शर्मिष्ठा राऊत, मानसी मागीकर असे कलकार आहेत. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
आणखी वाचा – यंदाचं वर्ष या कलाकरांसाठी ठरलं लकी, घरी नव्या पाहुण्याचं आगमन, काहींनी लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर केलं बाळाचं प्लॅनिंग
दरम्यान हा चित्रपट लग्न करणाऱ्या किंवा लग्नाचा विचार करणाऱ्या लोकांसाठी खास असल्याचे म्हंटले जात आहे. लग्न करताना तरुण-तरुणी काय विचार करतात? त्यांचा लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोण काय आहे? हे सगळं या चित्रपटामध्ये सांगण्यात आले आहे. दरम्यान यामध्ये विनोदी छटा असलेल्या देखील दिसून येतात. संपूर्ण कुटुंबाने पहावा असा हा चित्रपट तुमच्या भेटीला आला आहे.