Navri Mile Hitlerla Serial : ‘नवरी मिळे हिटलरला’ ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील लीला आणि एजेची कथा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. मालिकेत येणाऱ्या नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. त्यामुळे ही मालिका बघण्यात प्रेक्षकांना आणखी रस निर्माण होऊ लागला आहे. मालिकेत नुकतंच लीलाने जहागीरदारांचे घर सोडले. लीलाने एजे व अंतराच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला असून तिने अंतराचे जुनी साडीही परिधान केली होती. पण हीच गोष्ट एजेला आवडली नसून यावेळे एजेंनी तिला या घरात नीट वागायचे नसेल तर घर सोडून जा असं म्हटलं. यावर लीलाने घर सोडले. (Navri Mile Hitlerla Serial Updates)
त्यानंतर लीलाची मनधरणी करण्यासाठी एजेंची आई पुढे आली. लीलाची समजूत काढत त्याच्या आईने असं म्हटलं की, “एजे आधी खूप डॅशिंग होता. त्याच्या या डॅशिंगपणावरच अंतरा भाळली. पण ती निघून गेल्यावर त्याने स्वत:ला इतरांपासून दूर केलं. या सगळ्यातून एजेला तूच बाहेर आणू शकतेस. तू त्याला असं वाऱ्यावर सोडू नकोस”. त्यामुळे एजेंच्या प्रेमात असलेली लीला एजेंच्या आईला मी घरी येईन असं म्हणते आणि घरात येते.
आणखी वाचा – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’मुळे विकी कौशलला भिती, ‘छावा’ चित्रपटाची माघार, प्रदर्शन पुढे ढकलले
एजे व लीला यांचे लग्न झाले असले तरी एजेंनी अजून लीलाचा पत्नी म्हणून स्वीकार केलेला नाही. मात्र नुकत्याच आलेल्या प्रोमोमध्ये एजे लीलाच्या गळ्यात मंगळसूत्र घालत तिचा बायको म्हणून स्वीकार करणार आहे. जहागीरदारांच्या घरात दिवाळीच्या पूजेनिमित्त सगळे जमलेले असतात. पण या पूजेला लीला नसते. तेव्हा एजे तिच्याबद्दल आईला विचारतात. त्यांतर एजे स्वत: लीलाला बोलवण्यासाठी जातात. तेव्हा लीला आपल्या मनातील खंत एजेंना बोलून दाखवते. मालिकेच्या आगामी भागाचा हा नवीन प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला असून हा प्रोमो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
आणखी वाचा – दोन वर्षांची झाली आलिया-रणबीर यांची लेक, बॉलिवूडकडून सेलिब्रेशन, Unseen Photos व्हायरल
एजे लीलाला बोलवण्यासाठी जातात आणि तिला म्हणतात की “घरात दिवाळी असताना तू अंधार करुन का बसली आहेस?” असं म्हणतात. यावर लीला असं म्हणते की “मला ना बायको होण्याचा अधिकार आहे ना सासू होण्याचा हक्क… मग मी कुठल्या तोंडाने पूजेला बसू”. यावर एजे लीलाला घेऊन येतात आणि सर्वांसमक्ष तिच्या हातातील मंगळसूत्र काढून गळ्यात घालतात. त्यामुळे आता एजेंनी लीलाला गृहलक्ष्मीचा मान दिल्यानंतर आता त्यांच्या नात्यात काय य बदल होणार? हे आगामी भागांतून प्रेक्षकांना पाहता येणार आहे.